शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार-धुळे बसमधील प्रकार  : वाहकाने मनोरूग्णाला प्रवास सवलत नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:22 IST

मनोरूग्णाने वकीलामार्फत धुळे विभाग नियंत्रकांकडे केली तक्रार 

धुळे : दिव्यांग व्यक्तीला व त्याच्यासोबत असलेल्या मदतनीसाला बस प्रवास सवलत असतांनाही वाहकाने मनोरूग्ण व त्याच्या मदतनीसाला  यांना प्रवास सवलत नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार घडला आहे. दोंडाईचा येथील एक तरूण स्कीझोफेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याच्याकडे शासकीय रूग्णालयातील ५५ टक्के वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. त्याला औषोधोपचारासाठी धुळे तसेच आयुर्वेदीक गोळ्या घेण्यासाठी नंदुरबारला जावे लागते. अंध अपंग व्यक्तीस  ७५ टक्के व मदतनीसाला ५० टक्के सवलत महामंडळातर्फे देण्यात येते. हे दोन्ही सवलतीचे कार्ड त्यांच्याजवळ होते. ६ मे रोजी तो आजारग्रस्त तरूण  व त्याचा मदतनीस हे सायंकाळी नंदुरबार-धुळे बसमध्ये (क्र. एमएच ४०- एन ९०७९) बसले. बस शहरापासून पाच-सहा किलोमीटरवर आली असतांना वाहक रत्नाकर बागूल यांनी मनोरूग्ण प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे मागितले. त्या तरूणाने  अंध अपंग व्यक्तीचे ओळखपत्र दाखविले.मात्र केवळ ५५ टक्के असा उल्लेख असल्याने बस वाहकाने त्या रूग्णाच्या साथीदारास ५० टक्के सवलत देण्यास नकार दिला. रूग्णाने त्याच्याजवळील ओळखपत्र, वैद्यकीय कागदपत्र दाखवूनही वाहकाने अरेरावी करून बसखाली उतरून जा असे सांगितले. त्यावेळी इतर प्रवाशांचा खोळंबा नको म्हणून मनोरूग्णाने ७५ टक्के प्रमाणे तिकीटाचे १० रूपये व मदतनीसाचे ४५ रूपये असे ५५ रूपये देवून तिकीट घेतले. दरम्यान वाहकाने मनोरूग्णास नियमानुसार मिळणारी बस प्रवास सवलत नाकारून इतर प्रवाशांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. या संदर्भात त्याने अ‍ॅड. विनोद बोरसे यांच्या मार्फत धुळे विभागाच्या विभागनियंत्रकांकडे तक्रार केली आहे. त्यात बस वाहकाची योग्य चौकशी करून तक्रारदार मनोरूग्णास न्याय देण्याची मागणी आहे. अर्जावर तक्रारदार व अ‍ॅड. बोरसे यांच्या स्वाक्षºया आहेत. 

४यापूर्वीही त्या मनोरूग्णाला दोंडाईचा आगार प्रमुखांनी बस सवलत योजनेनुसार मदतनीस म्हणून शिक्का व प्रवास सवलत देण्यास नकार दिला होता. त्यावेळीही अ‍ॅड. विनोद बोरसे यांनी विभाग नियंत्रकाकडे तक्रार अर्ज दिला होता. शासकीय परिपत्रकाचा आधार घेऊन तक्रारदारास ७५ टक्के व मदतनीसाला ५० टक्के सवलत देणे अनिवार्य आहे असे कळवल्यानंतर तक्रारदारास दोंडाईचा आगाराने बस सवलतीचा पास दिला         होता. 

वाहकाने मनोरूग्णास अपमानास्पद वागणूक दिल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या प्रकरणाची विभागीय वाहतूक अधिकारी चौकशी करणार आहेत. संबंधितांचे जाबजबाब घेऊन, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.मनीषा सपकाळ,विभाग नियंत्रक,धुळे

टॅग्स :Dhuleधुळे