शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

गावाजवळील भात नदी पात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:39 IST

कापडणे । महसूल विभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांकडून कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : गावाजवळील भात नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरी होत आहे. मात्र, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.२०१८ व २०१९ मधील उन्हाळ्यात कापडणे येथील ग्रामस्थांना तब्बल ८ ते ९ महिने पाण्यासाठी रात्रंदिवस वणवण भटकंती करावी लागली होती. त्यामुळे नदी पात्रातून होणाऱ्या वाळू चोरीमुळे पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे कापडणे गावाजवळील भात नदीपात्रातून दररोज दहा ते पंधरा ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. मात्र, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कापडणे ग्रामपंचायत व महसूल विभागाने वाळू तस्करांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.मागील उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात तब्बल ३० ते ४० दिवसानंतर ग्रामपंचायतीमार्फत नळांना १५ मिनिटे पाणी सोडण्यात येत होते. टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. पाणीटंचाईच्या काळात पाणी मिळविण्यासाठी दैनंदिन कामकाज सोडून ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत होती. यंदा जोरदार पावसामुळे भात नदीला तब्बल १५ ते २० वर्षांनंतर महापूर आला. यामुळे नदीपात्रात वाळूचे प्रमाण वाढले असून गावविहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, वाळू माफियांकडून राजरोसपणे भात नदीच्या पात्रातून तब्बल दीड ते दोन महिन्यापासून सर्रासपणे अवैधरित्या वाळू चोरी होत आहे. कापडणे परिसरातील तारबल्ली शिवारात लांब अंतरापर्यंत असलेल्या भात नदीपात्रातून दररोज दहा ते पंधरा ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. मात्र, अद्याप यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यामुळे वाळूमाफियांची मुजोरी वाढलेली आहे. दररोज वाळूची अशीच वाहतूक सुरू राहिली तर थोड्याच दिवसात नदीपात्रात वाळू दिसणार नाही. ग्रामस्थांवर उन्हाळ्यात पाण्यासाठी पुन्हा वणवण भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपणार आहे.तारबल्ली शिवारातील भात नदीपात्रातून गेल्या दीड ते दोन महिन्यापासून दररोज दहा ते पंधरा ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळूची चोरी केली जात आहे. त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. सतत होणाºया वाळू उपशामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणार असून रब्बी व उन्हाळी खरीप हंगामातील पिके पाण्याविना सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. तसेच भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. त्यासाठी वाळू उपसावर संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी.-नानाभाऊ देवराम माळी, शेतकरीकापडणेच्या भात नदीपात्रातून कोणीही अवैधरित्या ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरी करताना महसूल विभागाच्या पथकाला आढळून आल्यास तात्काळ १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड करुन संबंधित चोरट्यांवर व वाहन मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील.-विजय पी बेहेरे, तलाठी, कापडणेकापडणे गावातील भात नदीपात्रातून अवैधरित्या वाळुची चोरी होत असेल तर यासंदर्भात तक्रार करणाºयांना ३१०० रुपये ग्रामपंचायतमार्फत बक्षीस देण्यात येणार आहे व वाळू चोरी करणाºयाला ११ हजाराचा दंड करण्यात येणार आहे. यासंदर्भात यापूर्वी गावात दवंडी देण्यात आलेली आहे. तरीदेखील आता महसूल विभाग व तहसीलदारांना निवेदन देऊन वाळू माफियांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची ग्रामपंचायतीमार्फत मागणी करण्यात येणार आहे.-जया प्रमोद पाटील, सरपंच कापडणे

टॅग्स :Dhuleधुळे