शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलाच्या माध्यमातून चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 18:59 IST

एलसीबीची कारवाई : ८९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

धुळे : हॉटेलमध्ये बसलेल्या एका मुलाजवळ पोते असून त्यात चोरीच्या वस्तू असल्याची माहिती मिळताच सापळा लावून त्याला पकडले़ पोलिसी खाक्या दाखविताच त्याने साथीदारासोबत चोरी केल्याची कबुली दिली़ त्या साथीदाराच्याही मुसक्या आवळण्यातस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले़ त्यांच्याकडून ८९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ दरम्यान, विधी संघर्षित बालकाला बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे़शहरातील मच्छीबाजार चौकातील मोहम्मदीया हॉटेलमध्ये एक विधी संघर्षित बालक बसलेला असून त्याच्याजवळ एक पोते आहे़ त्याच्यात चोरीच्या वस्तू असल्याचा संशय आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली़ माहिती मिळताच त्या हॉटेलच्या परिसरात सापळा लावण्यात आला़ त्या बालकाला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव सांगितले़ लागलीच पथकाने मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी (२२, रा़ ८० फुटी रोड, नटराज टॉकीजजवळ, धुळे) याला अटक करण्यात आली़ त्या दोघांनी मिळून नकाणे गाव आणि बिलाडी रोड भागात चोरी करुन या तांब्या-पितळाची भांडी, सोन्या-चांदीचे दागिने चोरुन आणल्याचे सांगितले़ त्यांच्याजवळून ५५ हजार २१० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, ३ हजार ६५० रुपये किंमतीचे तांबे पितळाची भांडे, ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ८८ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ दोन ठिकाणी केलेल्या चोरीची नोंद पोलीस ठाण्यात आहे़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदिप थोरात, प्रकाश सोनार, संदिप सरग, गौतम सपकाळे, राहुल सानप, सागर शिर्के, दीपक पाटील यांनी ही कारवाई केली आहे़