शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा :शेतकरी परराज्यातून मागवित आहेत कापसाचे संकरीत बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:16 IST

शासनाकडून वाण उपलब्ध नसल्याने कृषी विक्रेत्यांचे नुकसान

शिंदखेडा : शहर आणि परिसरातील कृषी सेवा केंद्रातील विक्रेत्यांना महाराष्ट्र शासनाने कापसाचे संकरित वाण उपलब्ध न करून दिल्याने या व्यापाºयांचे अतोनात नुकसान होत आहे. १० मे पासूनच शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी परराज्यात स्वत: जाऊन बीटी बियाणे विकत आणत आहेत. शेतकरी रोखीने बाहेर जाऊन बियाणे आणत असल्याने स्थानिक विक्रेत्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यामधील शेतकºयांना एक जूनपूर्वी बीटी कापूस लागवड करू नये, असे आवाहन केले आहे. यासाठी कृषी खात्याने विक्रेत्यांना बियाणे उपलब्ध करून दिलेले नाही, तसेच जर कुणी बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे तालुक्यातील तापी परिसर आणि काही ठराविक पाण्याची उपलब्धता असणाºया गावातील शेतकºयांनी कापूस बियाणे लागवडीची तयारी चालवली आहे. हे बियाणे आपल्या विक्रेत्याकडे उपलब्ध नसल्याने शेजारील मध्यप्रदेशातील सेंधवा, खेतिया, पानसेमल, तसेच गुजरातमधील निझर, कुकरमुंडा, वेलदा, सुरत आदी ठिकाणाहून बियाणे खरेदी करण्याचा सपाटा शेतकºयांनी लावला आहे. केवळ बियाणे उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बियाणे विक्रेत्यांची कुचंबणा होत आहे. यात विशेष धोका म्हणजे बियाणे रोखीने आणताना शेतकºयांच्या हाती असलेला पैसा संपून गेल्यास पुढे खते, औषधासाठी स्थानिक विक्रेत्याकडे उधारीचा व्यवहार असणार आहे. त्यासाठी त्यांना हे अडचणीचे ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विक्रेत्यांनाच अडचणीत आणणाºया या निर्णयाबद्दल विक्रेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

टॅग्स :Dhuleधुळे