शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयतर्फे पावणेदोन लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा, यासाठी आमदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने शिंदखेडा तालुक्यात तत्काळ म्हणजे ५ नोव्हेंबर २०२०ला ...

शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा, यासाठी आमदार जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने शिंदखेडा तालुक्यात तत्काळ म्हणजे ५ नोव्हेंबर २०२०ला

सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. त्यानुसार शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग, बाम्हणे रस्त्यावरील केशरानंद, शिंदखेडा रेल्वे स्टेशननजीक असलेल्या वर्धमान जिनिंगला सीसीआयने कापसाची खरेदी सुरू केली होती. मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याच्या पार्श्वभूमीवर जून २०२० पावेतो सीसीआयने खरेदी सुरू ठेवली होती. मागील वर्षी कोरोनामुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. शेतकऱ्याला हा अनुभव असल्याने शेतकऱ्याने कापूस पीक येताच खासगी व सीसीआयला कापूस विकून टाकला. मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच वेळेस खरेदी बंद करण्यात आली होती. मागील वर्षी १ जून २०२०पर्यंत शेतकऱ्यांचा सुमारे ७० हजार क्विंटल कापूस घरात पडून होता .परंतु आमदार जयकुमार रावल व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील यांचा प्रयत्नाने शेवट पावेतो केंद्र सुरू ठेवल्याने संपूर्ण कापूस खरेदी झाला होता. यावर्षी सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांनीही कापसाला चांगला भाव दिल्याने शेतकरी कापूस विकून मोकळा झाला. यावर्षी खासगी व्यापाऱ्यांनी सुमारे ६ हजार रुपये रोखीने भाव दिल्याने व्यापाऱ्यांनीही हजारो क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी कापसाचे उत्पन्न कमी आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शिंदखेडा तालुक्यात ५ नोव्हेंबर २०२०पासून कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली होती. सीसीआयने ५ हजार ४९६ ते ५ हजार ७२५ रुपये कापसाला प्रतिक्विंटल भाव दिला.

सीसीआयने यावर्षी १७ मार्च २०२१ पावेतो शिंदखेडा तालुक्यात तिन्ही केंद्रांवर कापूस खरेदी सुरू ठेवली होती. दोंडाईचा केंद्रावर ३ हजार ३८२ व शिंदखेडा केंद्रावर १ हजार ७३९ शेतकऱ्यांनी म्हणजे एकूण ५ हजार १२१ शेतकऱ्यांनी नोंद केली होती. दोंडाईचा जिनिंगला १ लाख २० हजार ३०९, तर शिंदखेडा जिनिंगला ६५ हजार ३१ क्विंटल अशी एकूण १ लाख ८५ हजार ३४० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केल्याची माहिती दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पंडित पाटील यांनी दिली.

दरम्यान, यावर्षी सीसीआय केंद्रावर सुमारे १ लाख क्विंटल कापूस कमी खरेदी झाल्याचे दिसत आहे. मागील वर्षी सीसीआयने ३ लाख २८ हजार क्विंटल कापसाची १७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती.

सीसीआयने १७ मार्च २०२१पासून कापूस खरेदी बंद केली आहे. सुमारे ३८ हजार ४९३ कापसाच्या गाठी असून, सरकी काढण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्याचा संपूर्ण कापूस विक्री होईपावेतो सीसीआय खरेदी केंद्र आमदार जयकुमार रावल यांचा प्रयत्नाने सुरू राहिले. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, सचिव पंडित पाटील, उपसचिव विजय पाटील, जिनिंग केंद्र चालक ज्ञानेश्वर भामरे, रवी उपाध्ये आदींनी या कामी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया

सीसीआयने यावर्षी ५ हजार ७२५ कापसाला भाव दिला तरी उत्पन्न खर्चापेक्षा तो कमी आहे. कापसाचा दर वाढवून द्यावा. खासगी व्यापारी कापूस लगेच मोजून पैसा अदा करतो, म्हणून बरेच शेतकरी व्यापाऱ्यांस कापूस विक्री करतात.

धनराज पाटील, शेतकरी-

कापूस व्यापारी-

यावर्षी कापसाचे उत्पन्न कमी आले. शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव व रोख पैसे दिल्याने बरेच शेतकरी विश्वासाने आमच्याकडे कापूस विक्री करतात.

संजय पाटील, व्यापारी.