शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तापी जलवाहिनीला लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:00 IST

बाभळे फाटा ते सोनगीर दरम्यान गळती : दररोज लाखो लिटर्स पाण्याची नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : एप्रिल महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटल्यानंतर आता सूर्य आग ओकायला लागला. ऊन चांगलंच तपायला सुरवात झाली. आगामी दोन महिन्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन महत्वाचे आहे. पाणी जपून वापरणे गरजेचे झाले आहे. मात्र धुळे शहराला पाणी पुरवठा करीत असलेल्या तापी नदीवरील योजनेच्या जलवाहिनीला काही ठिकाणी छोट्या मोठ्या लागलेल्या गळत्यांमधून लाखो लिटर वाया जाणाऱ्या शुद्ध पाण्याकडे महानगर पालिकेचे लक्ष नसल्याचे दिसते.धुळे शहराला पाणी पुरवठा करीत असलेल्या तापी नदीवरील योजनेच्या जलवाहिनीला गेल्या काही दिवसांपासून बाभळे फाटा ते सोनगीर दरम्यान गळती सुरू आहे. या मधून शुद्ध केलेले खर्चिक लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. दरम्यान वेळोवेळी दुरुस्ती करून देखील त्याच जागी पुन्हा गळती लागत असते.या मुळे दुरुस्तीच्या कामाच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण होतआहे. दरम्यान प्रगतीवर असलेल्या सुलवाडे-जामफळ-कनोली या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून जात असलेल्या या जलवाहिनी स्थलांतर करण्याचे काम सुरू होते.मात्र कोरोनामुळे हे काम सध्या स्थगित आहे. बुडीत क्षेत्रातील नवीन जलवाहिनी होईल तेव्हा होईल पण सध्या या जुन्या जलवाहिनीच्या गळती मधून लाखो रुपये खर्चिक शुद्ध केलेले लाखो लिटर पाणी वाया जात आहे.पाणीपुरवठा ट्रान्सफार्मरला धोकादरम्यान जलवाहिन्यांच्या एका गळतीच्या परिसरात सोनगीरसाठी पाणी पुरवठा करीत असलेल्या विहिरीसाठीचे एक्सप्रेस फीडर वीजवाहिनीचे ट्रान्सफर्मर आहे. एखाद्या वेळेस गळती फुटून मोठी झाली तर गळतीचे पाणी ट्रान्सफर्मरवर येऊन त्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धुळे महानगरपालिकेने याकडे लक्ष देवून कायमस्वरूपी दुरूस्ती करावी.

टॅग्स :Dhuleधुळे