शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकान फोडून तेलासह रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:14 IST

वाडीभोकर रोड पाठोपाठ साक्री रोडवरील घटना, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

धुळे : टाळेबंदी काळात भरभक्कम पगार असलेल्या शासकीय नोकरांकडे घरफोडीचे प्रमाण वाढले होते. परंतु आता चोरट्याने मेडीकल दुकान, किराणा दुकानांकडे आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. वाडीभोकर रोडवरील घटनेपाठोपाठ लागलीच साक्री रोडवरील किराणा दुकान फोडून चोरट्याने तेल, पावडरसह काही प्रमाणात गल्यातील रोकड असा हजारो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली.जिल्ह्यात टाळेबंदी काळात पोलीस, महसूल, शिक्षक अशा शासकीय सेवेत असणाऱ्यांकडे चोरट्याने हातसफाई केली. दागिन्यांसह महागडे कपडे, ब्रॅण्डेड वस्तू, लाखोंची रोकड चोरीला गेल्याचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहे. परंतु काही दिवसांपासून चोरट्यांनी आपला मोर्चा हा सर्वसामान्य नागरीकांकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी चाळीसगाव रोड भागात एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या एका लोहाराकडे मुलीच्या लग्नासाठी जमविलेले पैसे चोरीला गेले होते. तर वाडीभोकर रोडवरील विनायक नगरजवळील एका मेडीकल दुकानातून औषधांसह रोकड लांबविल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटे साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयासमोर गणेश नावाच्या किराणा दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.दुकानाचे मालक कैलास अग्रवाल सकाळी दुकानावर आले असताना त्यांना दुकानाचे शटर उघडे असल्याचे दिसून आले. दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी गुरुवारी पहाटे गॅस कटरच्या सहाय्याने दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करीत ३ ते ४ तेलाचे खोके, पावडरचे डबे, डोक्याला लावायच्या तेलाच्या बाटल्या, गल्यात असलेली ३ ते ४ हजाराची रोकडसह अन्य किराणाचा सामान लंपास केला. दुकानात चोरी झाल्याची घटना त्यांनी पोलिसांना कळविली. माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ श्वान पथक आणि ठसे तज्ञाच्या पथकाने देखील धाव घेतली. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने सायंकाळी उशिरा चोरीचा गुन्हा दाखल झाला.