शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:19 IST

थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील विविध विद्यालय व महाविद्यालयात बक्षिस वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. वाडिले ...

थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील विविध विद्यालय व महाविद्यालयात बक्षिस वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.वाडिले महाविद्यालयथाळनेर येथील अन्नपूर्णादेवी विद्या प्रसारक संस्था संचलित कै.पितांबर शंकर वाडिले कला महाविद्यालयात बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी विद्यापीठ गुणवत्ता यादीत १६३६ विद्यार्थ्यांमधून मराठी या विषयात प्रथम आलेल्या ममता दरबारसिंग जमादार या विद्यार्थिनीचा किसान विद्या प्रसारक संस्थेचे वाडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एल. झुंजारराव यांच्याहस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.तसेच चौथ्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत आलेल्या सलोनी गजेंद्र गुजराथी हिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.वाय. जाधव यांनी प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठस्तरीय युवारंगांमध्ये सहभागी झालेल्या वैष्णवी वाघ, विसपुते व अनिल नंदू थोरात यांचा देखील मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र वाडीले, सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोळी आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेतील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.विजय झुंजारराव यांनी केले.संत गाडगे महाराज विद्यालयात कार्यक्रमथाळनेर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित संत गाडगे महाराज विद्यालय व दत्ता पवार कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, जि.प. सदस्य भैरवी प्रेमचंद शिरसाठ, पं.स. सदस्य विजय बागुल, उपसरपंच आशाबाई वामन कोळी, पत्रकार हेमंत चौधरी, ग्रा.पं. सदस्य भटू शिरसाठ, डोंगर कोळी, उज्वल निकम, रवींद्र कोळी आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य शामकांत ठाकरे यांनी केले. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक विवेक सनेर, व्ही.बी. सोनवणे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे