शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 22:55 IST

मुंबई - आग्रा महामार्गावर, नागपूर - सुरत महामार्गावर घटना

धुळे/कापडणे - तालुक्यातील मुंबई - आग्रा महामार्गावर सरवड फाटयाजवळ झालेल्या आयशर गाडीने धडक दिल्याने बोरीसकडून धुळ्याकडे मोटारसायकलने जाणारे दोन चुलत देवरे बंधु जागीच ठार झाल्याची घटना रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. तर दुसरी घटना नागपूर - सुरत महामार्गावर मुकटी गावाजवळ घडली. त्यात किराणा घेण्यासाठी पायी गावात येत असतांना मोठा ट्रेलर अंगावरुन गेल्याने  ३५ वर्षीय पिता संजय कुंभार आणि तीन वर्षाचा  मुलगा  राजेंद्र  हे दोघे ठार झाले. ही घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.मुंबई - आग्रा महामार्गावर घडलेल्या घटनेत तालुक्यातील बोरीस येथील रहिवासी कैलास आत्माराम देवरे (वय ५२ )व राजेंद्र भानुदास देवरे  (५०) हे  दोघे मोटारसायकलवरून धुळ्याकडे जात असताना सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान सरवड फाटयावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहन शिरपूरच्या दिशेकडे पसार झाले. अपघातात दोन्ही देवरे बंधू हे जागीच ठार झाले. भाऊबंदकीत मयत दोघांचे भावाचे नाते होते.सदर गुन्ह्याची नोंद सोनगीर पोलीस स्टेशन येथे  रात्री उशिरापर्यंत होणार आहे अशी माहिती सोनगीर पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली आहे.मयत कैलास आत्माराम देवरे यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे सुरेश आत्माराम देवरे यांचे ते भाऊ होत.  मयत राजेंद्र भानुदास देवरे यांच्या पश्चात पत्नी मुले काका असा परिवार आहे.ट्रेलरने चिरडल्याने पिता-पुत्राचा मृत्यूतर दुसऱ्या घटनेत नागपूर - सुरत महामार्गावर मुकटी गावात माऊली नगरात राहणारे संजय हिरामण कुंभार (वय ३५) व त्यांचा तीन वर्षाचा मुलगा हेमंत संजय कुंभार हे दोघे गावात पायी येत होते. महामार्गावर आल्यावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आर.जे. ०४ जीबी ९५७४ क्रमांकाचे मोठ्या ट्रेलरने त्यांना मागून धडक धडक दिली. दोघे पिता - पुत्र खाली पडले. त्यांच्या अंगावरुन ट्रेलरची चाके गेल्याने दोघे पिता - पुत्र काही क्षणातच जागीच गतप्राण झाले.मयत संजय कुंभार हे गावात मातीची भांडी तयार करुन ती विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. तीन मुलीनंतर झालेल्या आपल्या एकुलत्या एक मुलासोबत ते किराणा घेण्यासाठी घरुन निघाले होते. अवघ्या काही मिनिटातच झालेल्या अपघातात दोघांना मृत्यू झाला. घराचा कर्ता पुरुष आणि एकुलता एक मुलगा मेल्याने मयत संजय कुंभार यांची पत्नी व तीन मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळले आहे.