शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीचे विद्रुपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 22:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीमध्ये विविध विभागांच्या बाहेर भिंतींना पत्रके चिकटवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीमध्ये विविध विभागांच्या बाहेर भिंतींना पत्रके चिकटवून रंगरंगोटीचे नुकसान केले जात आहे़ गुटखा शौकिंनांनी इमारतीच्या भिंती रंगवून टाकल्या आहेत़ कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या देखण्या इमारतीचे अक्षरश: विद्रुपीकरण झाले आहे़ग्रामीण भागात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंचायत समितीला मात्र आपल्याच विभागातील स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालयच. पंचायत समितीशी सर्वसामान्य नागरीकांचा थेट संपर्क येत असतो़ शिक्षकांसोबतच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांचा संबंध येत असतो. या घटकांसाठी असलेल्या योजना, अथवा आदेश, सूचना असतात. त्या लावण्यासाठी खरे तर प्रत्येक शासकीय कार्यालयात सूचना फलक (नोटीस बोर्ड) असतो. त्यावरच संबंधित कागद लावणे अपेक्षित असते. मात्र पंचायत समितीमध्ये याउलट स्थिती दिसून येते.नोटीस बोर्ड म्हणून भिंतीचा उपयोग होतो़ विविध सूचनांची पत्रके, योजनांच्या लाभार्थ्यांची यादी लावण्यासाठी भिंतींचा उपयोग होऊ लागला आहे. विशेष म्हणजे हे लावलेले कागद दोन-दोन वर्षांपासून तशेच आहेत. ते काढण्याची तसदीही पंचायत समितीने घेतलेली नाही.कागदे भिंतीवर चिकटविण्यात सर्वच विभाग पटाईत आहेत़ सामान्य प्रशासन विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष मात्र आघाडीवर आहेत़ सामान्य प्रशासन विभागाच्या भिंतीवर लावलेल्या विजयी उमेदवारांच्या याद्या निवडणूक होवून महिना उलटला तरी जशाच्या तशा आहेत़ जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या भिंतीवर विविध जाहिराती, माहिती पत्रके आणि लाभार्थ्यांच्या यादीसह आकडेवारीची पत्रके गेली अनेक महिने जशीच्या तशी आहेत़ पत्रके चिकटविण्यात कृषी विभाग आणि रोजगार हमी योजना विभाग देखील मागे नाही़ बांधकाम विभागाला तर स्वच्छता काय असते हेच माहीती नसल्याचे जाणवते़ तसेच पंचायत समितीच्या आवारात कुणीही रिक्षा आणि हातगाड्या पार्क करुन मोकळा होतो़ रात्रीच्या वेळी तर पार्किंगच्या जागेवर ग्रामीण भागातील अभ्यागतांसाठी ठेवलेल्या बाकड्यांवर दारुच्या मैफिली जमत असल्याची माहिती मिळाली आहे़ याठिकाणी दिवसभर सामान्य नागरीकांसह शिक्षक आणि ग्रामसेवकांची वर्दळ असते़ पार्किंगसाठी असलेल्या तळमजल्याचे बीम गुटख्याच्या थुंकीने माखले आहेत़पंचायत समितीच्या इमारतीमधील मुतारीची तर अतीशय दयनीय अवस्था आहे़ मुतारी आणि संडास तुंबला आहे़ त्यात पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे़ अधिकारी आणि कर्मचारी या मुतारीचा वापर करतात, परंतु तिच्या दुरूस्तीचा किंवा स्वच्छतेचा शहाणपणा मात्र कुणालाही सूचत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल़बॅनर लावून स्वच्छतेचा संदेश देणाºया पंचायत समितीच्या ‘दिव्या खाली अंधार’ असा हा प्रकार आहे़ याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भिंतींचे होणारे विद्रुपीकरण थांबणार तरी कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सन २०१५-२०१६ मध्ये पुर्ण झाले़ इमारतीच्या बांधकामाला जवळपास दोन कोटीच्या आसपास खर्च आला़ पार्किंगसह इतर सोयी सुविधांनी युक्त अशा या प्रशस्त इमारतीचे विद्रुपीकरण झाले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे