शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षित पानखेडा गढीवर स्वच्छता, संवर्धन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:22 IST

पिंपळनेर : ‘आपला वारसा, आपण जपूया’ उपक्रम, शिवदुर्ग व दुर्गवीर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यात अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गढी असून, दुर्लक्षामुळे त्यांची दुरवस्था झालेली असली तरी आजही त्या अस्तित्व टिकवून आहेत. यापैकीच एक असणाºया पानखेडा ता.साक्री येथील पुरातन गढीची स्वच्छता व संवर्धन मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेत सटाणा (जि.नाशिक) येथील दुर्गवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, साक्री येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानचे पदाधिकारी, तसेच आ.मा.पाटील व दीपरत्न विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आदि सहभागी झाले होते.धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. असे एक गाव नाही जेथे ऐतिहासिक वास्तू नाहीत. ६ व्या शतकापासून पिंपळनेरचे अनेक उल्लेख विविध ताम्रपट व कागदपत्रात येतात. तालुक्यात अभिर, राष्ट्रकूट, यादव घराण्यांच्या वेगवेगळ्या कालखंडात समृध्द राजवट नांदल्या आहेत. पुढे मोघलांकडून हा संपूर्ण प्रदेश स्वराज्यात आला आहे. साक्री तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वधिक गढया देखील आहेत. त्यातीलच एक गढी पिंपळनेर पासून ४ किमी अंतरावर पानखेडा येथील एका डोंगरावर आहे.‘आपला वारसा आपण जपूया’ या मोहिमेअंतर्गत पानखेडा गढीची नुकतीच स्वच्छता व संवर्धन मोहीम करण्यात आली.यात बुरूज व तटबंदीवरील काटेरी साबर, झुडपे काढण्यात आली. आतील गृहांची देखील साफसफाई करण्यात आली. एका बुरूजावर भगवा ध्वज लावण्यात आला. ज्या गढीने शेकडो वर्षांचा इतिहास अनुभवला, परकीय आक्रमण अंगावर झेलून तत्कालीन गावकऱ्यांचे रक्षण केले ती गढी गेली कित्येक दशके काटेरी साबरीच्या विळख्यात अडकलेली होती. या मोहिमेच्या निमित्ताने ती मोकळा श्वास घेत होती. छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित होऊन ह्या ऐतिहासिक गढीची साफसफाई करण्याच्या मोहिमेत पानखेडा येथील दीपरत्न माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने कार्य करत होत्या. सदर गढीही किमान ६०० वर्षे तरी जुनी असावी, असे लक्षात येते. या संवर्धन मोहिमेत पिंपळनेर येथील कर्मवीर आ.मा. पाटील विद्यालयाचे शिक्षक व शिवदुर्ग प्रतिष्ठानचे सदस्य जयेश खैरणार व त्यांचे विद्यार्थी, पानखेडा येथील दीपरत्न माध्यमिक विद्यालयातील सचिन देशमुख व त्यांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सटाणा येथील दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित जाधव व नितिन अहिरे सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे