शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती; शिंगोलीत उभारणार १०६ मीटरचा 'सिंगल स्पॅन' पूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 20:10 IST

राष्ट्रीय महामार्गावरून होणार रेल्वेचे क्रॉसिंग,मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

धाराशिव : जिल्ह्याच्या विकासाची 'लाइफलाइन' समजल्या जाणाऱ्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्याकडे झेपावत आहे. या प्रकल्पात अभियांत्रिकीचा एक थक्क करणारा नमुना पाहायला मिळणार असून, शिंगोलीजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मध्य रेल्वेच्या इतिहासातील सर्वाधिक लांबीचा (१०६ मीटर) 'सिंगल स्पॅन' पूल उभारण्यात येत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून या ऐतिहासिक टप्प्याची माहिती दिली.

जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील सर्वात कठीण मानला जाणारा टप्पा म्हणजे शिंगोली येथील राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस करणारा रेल्वे पूल. या पुलाच्या दोन खांबांमधील अंतर तब्बल १०६ मीटर असून, एवढा मोठा 'सिंगल स्पॅन' असलेला हा मध्य रेल्वेचा पहिलाच पूल ठरेल. पुलाच्या उभारणीसाठी प्रगत ड्रिलिंग मशिनरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्या पायाभरणीचे काम सुरू असून, पुढील ८ ते ९ महिन्यांत पुलाचे लॉन्चिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आ. पाटील म्हणाले.

मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टसोलापूर-तुळजापूर-धाराशिव या ८४.४४ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाइन कामाच्या प्रगतीचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंगोली याठिकाणी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. या प्रकल्पाचा धाराशिव ते तुळजापूर हा पहिला टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. तर, सोलापूर ते तुळजापूर हा दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाणार आहे. यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

पर्यटनात वाढ होईल, उद्योगांनाही गती येईलधाराशिव रेल्वे स्थानकापासून शिंगोलीच्या दिशेने रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे तुळजापूर हे तीर्थक्षेत्र थेट रेल्वेने जोडले जाऊन धार्मिक पर्यटनात मोठी वाढ होईल. शिवाय दळणवळण सुलभ झाल्यामुळे स्थानिक व्यापारी आणि उद्योगांना मोठी गती मिळेल. सोबतच सोलापूर-धाराशिव प्रवासाचा वेळ देखील लक्षणीयरीत्या कमी होईल.

भाविकांचा प्रवास सुखकर होईलया रेल्वे मार्गामुळे धाराशिवकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होत आहे. विशेषतः तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या देशभरातील कोट्यवधी भाविकांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि जलद होईल.- आ. राणाजगजितसिंह पाटील, उपाध्यक्ष, 'मित्र' संस्था

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv-Tuljapur Railway Project Speeds Up; 106-Meter Bridge in Shingoli

Web Summary : The Dharashiv-Tuljapur railway project progresses, featuring a 106-meter 'single span' bridge near Shingoli. This ambitious project aims to connect Tuljapur, boost tourism, and reduce travel time, completing the first phase by March 2027, easing pilgrimages.
टॅग्स :railwayरेल्वेdharashivधाराशिव