सध्या लसीकरण विभागाकडे कोवॅक्सिन लसी उपलब्ध आहेत. बुधवारी या लसींचे डोस १२ केंद्रांवरून दिले जाणार आहेत. पहिला डोस केवळ २५०० नागरिकांनाच मिळणार आहे, तर दुसऱ्यासाठी ३०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात मुरुम, लोहारा, सास्तूर, तेर, भूम, वाशी ग्रामीण रुग्णालय तसेच तुळजापूर, परंडा, उमरगा, कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयांत लसीकरण सत्र होणार असून, याठिकाणी प्रत्येकी पहिला डोस २००, तर दुसरा डोस प्रत्येकी २५ जणांना मिळणार आहे. पहिला डोस हा ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच मिळणार आहे, तर दुसरा डोस ऑन द स्पॉट मिळेल. जिल्हा रुग्णालयात ऑनलाईन नोंदणी केलेल्या ३०० जणांना, तर ऑन द स्पॉट दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या २५ जणांना लस मिळेल. शासकीय आयुर्वेद रुग्णालयातही २०० जणांना पहिला, तर २५ जणांना दुसरा डोस उपलब्ध आहे.
लसी आटल्या, आज केवळ १२ केंद्रांवर डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST
सध्या लसीकरण विभागाकडे कोवॅक्सिन लसी उपलब्ध आहेत. बुधवारी या लसींचे डोस १२ केंद्रांवरून दिले जाणार आहेत. पहिला डोस केवळ ...
लसी आटल्या, आज केवळ १२ केंद्रांवर डोस
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}