उस्मानाबाद : पावसाळा म्हटला की वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा भाग असतोच. वीज चमकताना मोबाईल बंद करणे आवश्यक असून झाडाखाली थांबणेही धोक्याचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आकाशातील वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
विशेष करून गुरांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. पाऊस आला की रानातील गुरे ही पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबतात आणि नेमकी तेथेच वीज पडते. त्यामुळे गुरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिकच वाढले आहे. अनेक ठिकाणी गुरांचे गोठे वृक्षाची सावली पाहून तयार केले जात असतात. पावसात वृक्षावरच वीज कोसळत असल्याने गोठ्यातील जनावरे तसेच नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. मागील साडेतीन वर्षात ११ जणांचा मृत्यू झाला. १७४ जनावरे दगावली आहेत.
वीज पडल्याने झालेले मृत्यू
वर्ष मनुष्यबळी जनावरांचा मृत्यू
२०१८ ३ ३७
२०१९ ३ ६५
२०२० ५ ६२
२०२१ १५ जुलैपर्यंत ५ १०
कोणाला किती मिळते नुकसान भरपाई
वीज पडून मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास ४ लाखांची नुकसान भरपाई दिली जाते. एक आठवड्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असेल. तर १२ हजार ७०० रुपये मदत करण्यात आली. आठवड्यापेक्षा कमी कालावधीत उपचार घ्यावे लागले तर ४ हजार ३०० रुपये मदत दिली जाते.
शेळी, मेंढी दगावल्यास ३ हजार रुपये, वासरू दगावल्यास १६ हजार रुपये गाय, म्हैस ठार झाल्यास ३० हजार रुपये मदत दिली जाते.
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...
शेतात असाल तर शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्या,
पाण्यात असाल तर तत्काळ बाहरे या, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका.
उंच जागेवर, झाडावर चढू नका, विद्युत उपकरणे बंद ठेवा,
मोबाईल, विजेवर चालणाऱ्या यंत्रापासून दूर राहा.
कोट...
पावसाळ्याच्या दिवसात वीज पडून मृत्यू मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी वादळवारा व विजांचा कडकडाट सुरू होताच. सुरक्षित जागी थांबणे, इलेक्ट्रिक उपकरणे, मोबाईल बंद ठेवावा.
वृषाली तेलोरे,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा
किती
वीज पडून जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता प्रशासनाकडून जिल्ह्यात चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वीज अटकाव मनोरे बसविण्यात आले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द, उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा, उमरगा तालुक्यातील माडज, कळंब तालुक्यातील मोहा या ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभे आहेत.
जिल्ह्यात आठ तालुके असताना केवळ चार तालुक्यातच वीज अटकाव मनोरे असल्याने अन्य तालुक्यातही वीज अटकाव मनोरे उभा करावेत, अशी मागणी नगारिकांतून होत आहे.