शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक समस्येबाबत बैठकीत झाली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

उमरगा : शहरातील बाजारपेठेत होत असलेली गर्दी, तसेच मुख्य रस्त्यावर, शिवाजी चौक, इंदिरा चौक, आरोग्यनगरीतील वाहन पार्किंग व हातगाडे ...

उमरगा : शहरातील बाजारपेठेत होत असलेली गर्दी, तसेच मुख्य रस्त्यावर, शिवाजी चौक, इंदिरा चौक, आरोग्यनगरीतील वाहन पार्किंग व हातगाडे यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने आ.ज्ञानराज चौगुले यांनी पालिका व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली.

यावेळी आ.चौगुले यांनी उमरगा शहरात ‘पे ॲण्ड पार्क’ ही संकल्पना राबविण्यासाठी रितसर प्रस्ताव तयार करून, जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविणे, पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीलगत व आरोग्यनगरीमध्ये प्रवेश करतेवेळी पूर्व बाजूच्या कोपऱ्यात, तसेच बस स्थानक प्रवेशद्वाराजवळील खुल्या जागेत ही ‘पे ॲण्ड पार्क’ची सुविधा केल्यास आरोग्यनगर, शिवाजी चौक व इंदिरा चौक येथील वाहतुकीचा होणारा खोळंबा दूर होईल. मुख्य रस्त्यावरील फळगाडे व हातगाडे संबंधित दुकानापासून पाच फूट अंतरावर असल्यास व दुकानासमोर बेशिस्त पार्किंगला मज्जाव केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊ शकते, अशा सूचना केल्या.

आरोग्यनगरीसह शहरातील इतर गर्दीच्या ठिकाणी एकतर्फी वाहतूक करणे, रिक्षाचालकांना वाहन पार्किंगला शिस्त लावणे, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या सर्व बाबींची पूर्तता होण्यासाठी न.प.च्या बैठकीत प्रस्ताव तयार करून, मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांक़डे सादर करावा, अशा सूचना आ.चौगुले यांनी यावेळी केल्या. बैठकीस पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, नगर अभियंता तुळशीदास वऱ्हाडे आदी उपस्थित होते.