शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पुन्हा अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

उस्मानाबाद : तब्बल ९०४ कोटी रुपये खर्चाचा व देशभरातील भाविकांच्या आस्थेचा मार्ग असलेला सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पुन्हा अडगळीत पडण्याची चिन्हे ...

उस्मानाबाद : तब्बल ९०४ कोटी रुपये खर्चाचा व देशभरातील भाविकांच्या आस्थेचा मार्ग असलेला सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग पुन्हा अडगळीत पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. केंद्र-राज्य भागीदारीत असलेल्या या प्रकल्पाला राज्य शासनाने यावेळीही ठेंगा दाखविला आहे.

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा ८४.४४ किमी लांबीचा मार्ग असून, यासाठी ९०४.९२ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये हा रेल्वेमार्ग मंजूर करून तो पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंजुरी मिळाली व २०१९ मध्ये भूमिपूजनही करण्यात आले आहे. मात्र, पुरेशी आर्थिक तरतूद या मार्गासाठी होत नाहीये. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पाप्रमाणे खर्चाचा ५० टक्के हिस्सा उचलण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्येच मान्य केले होते. राज्य सरकारची अधिकृत सहमतीही तेव्हा रेल्वे बोर्डास कळविली होती. मात्र, या सहमतीनंतर पुढे राज्याकडून कसल्याही हालचाली झाल्या नाहीत. दरम्यान, केंद्र सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू रहावे, यासाठी समप्रमाणातील राज्याच्या हिस्स्याची तरतूद करण्याबाबत रेल्वे विभागाचे मुख्य अभियंत्यांनी नुकतीच प्रधान सचिवांकडे मागणी केली आहे. एकिकडे रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण व भूसंपादनाच्या कामाला सुरुवात झालेली असताना राज्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये या प्रकल्पाचा साधा उल्लेखही नाही. परिणामी, हा प्रकल्प रेंगाळण्याची चिन्हे वाढली आहेत.

नकारात्मकता कायम...

भाजप-सेना युतीच्या काळात त्यांच्या सरकारने अर्धा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. तसेच अधिकृत पत्रही शासनाकडून रेल्वेला देण्यात आले होते. मात्र, यापूर्वीच्या अधिवेशनात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग संपूर्णतः केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागाने होणार असल्याने राज्य शासनाने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर सभागृहात देऊन या मार्गाविषयीची अनास्थाच प्रकट केली होती. त्यामुळे राज्य शासनाची या मार्गाविषयीची भूमिकाही यानिमित्ताने समोर आली आहे.

नाशिकला मिळते, मग इथे का नाही : आमदार पाटील

पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा पुरवणी मागण्यांमध्ये साधा उल्लेखही नाही. या प्रकल्पाचे काम थांबू नये, यासाठी राज्य आकस्मिक निधीमधून तातडीने २२ कोटी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधितांची व्हर्च्युअल बैठक घेऊन तुळजाभवानी देवीच्या लाखो भक्तांसह जिल्हावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.