शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता नाही ऑक्सिजनचा तोटा, मुकाबल्यासाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. तेव्हा पुणे, हैद्राबाद येथून ऑक्सिजन मागवावे लागले. दररोज जवळपास १९ हजार ५०० लीटर्स ...

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. तेव्हा पुणे, हैद्राबाद येथून ऑक्सिजन मागवावे लागले. दररोज जवळपास १९ हजार ५०० लीटर्स ऑक्सिजन लागत होते. तेव्हा दमछाक उडाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने नियोजन सुरू केले. लोकप्रतिनिधींनीही यास चांगली साथ दिली. यामुळे अत्यंत कमी कालावधीत ऑक्सिजन प्रकल्प उभे झाले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयातील १० हजार लीटर्स क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प सुरू आहे. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात १३ हजार लीटर्स क्षमतेचा प्रकल्प १५ ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होऊ शकेल.

दरम्यान, हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात ३०० एलपीएम, तर उमरगा येथे ४२० एलपीएम क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. परंडा येथे ५०० एलपीएम क्षमतेचा प्रकल्प पूर्ण झाला असून, जोडणी व चाचणी राहिली आहे. जिल्हा रुग्णालयात १००० एलपीएम, कळंब येथे ६०० एलपीएम, तर तुळजापूर येथे ५०० एलपीएम क्षमतेचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. लवकरच त्यांचेही काम सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

खासगी उद्योगांचाही पुढाकार...

धाराशिव कारखान्याने सर्वात आधी ६ हजार लीटर प्रतिदिन ऑक्सिजन उत्पादन सुरू केले आहे. पाठोपाठ नॅचरल शुगर्स कारखान्यानेही १ हजार लीटर्स प्रतिदिन उत्पादन ७ जुलैपासून सुरू केले आहे. रुपामाता ॲग्रोटेकची यंत्रसामग्री प्राप्त होऊन उभारणी सुरू झाली आहे. २५ जुलैपर्यंत हा प्रकल्पही पूर्ण होईल. भैरवनाथ कारखान्यात प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे.

आराखडे तयार करा...

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची गरज शक्यतो स्थानिक पातळीवर भागविली जावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना २२ जुलैपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडे तयार करून पाठविण्यास सूचित केले आहे. यामध्ये रुग्णालयाची क्षमता व गरज तपासून त्या नोंदी अंतर्भूत केल्या जातील.