शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाहाच्या भीतीने पळून जाणारी अल्पवयीन मुले रेल्वे स्थानकावर ताब्यात; मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:59 IST

सतर्कतेमुळे वाचले बालपण! घरच्यांनी जबरदस्तीने ठरवलेले लग्न टाळण्यासाठी अल्पवयीन मुले निघाली होती मुंबईला; धाराशिवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन.

धाराशिव : घरच्यांनी जबरदस्तीने ठरवलेला बालविवाह टाळण्यासाठी परभणी जिल्ह्यातून रेल्वेने मुंबईला पळून जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांची धाराशिव रेल्वे स्थानकावर सुटका करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलगा आणि १५ वर्षीय मुलगी कोणालाही न सांगता बिदर-पनवेल एक्सप्रेस (गाडी क्र. २२१४४) ने मुंबईकडे जात होते. ही मुले बेपत्ता असल्याची माहिती नांदेड येथील सुनील हिवळे आणि जळगाव येथील विजयकुमार वाघमारे यांनी युवा ग्राम विकास मंडळाचे संतोष रेपे यांना दिली. माहिती मिळताच रेपे यांनी लातूरवरून एका कार्यकर्त्याला त्याच गाडीत शोध घेण्यासाठी पाठवले आणि धाराशिव चाईल्ड हेल्पलाईनला पाचारण केले. रेल्वे स्थानकावर पोलीस आणि हेल्पलाईन टीमने या मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गंभीर बाब समोर आली.

विवाहाचा होता दबावसंबंधित बालिकेला वडील नाहीत. आई आणि मामाने तिचा विवाह नात्यातील एका मुलाशी ठरवला होता. येत्या ७ मे रोजी हा बालविवाह होणार होता. मात्र, हे लग्न मान्य नसल्याने तिने आपल्या एका ओळखीच्या मुलासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बालके अल्पवयीन असून त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत मुंबईसारख्या मोठ्या शहरात पोहोचल्यावर त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. मात्र, वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे धाराशिव स्थानकावर त्यांना रेस्क्यू करण्यात आले. या मोहिमेत रेल्वे पोलीस मिरगणे, निलेश कांबळे व त्यांचे पथक, चाईल्ड हेल्पलाईनचे अशोक चव्हाण, वंदना कांबळे, परमेश्वर गवाड आणि युवा ग्राम विकास मंडळाचे संतोष रेपे, बाळासाहेब लाड व संभाजी वळसे यांनी सहभाग घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Child Marriage Averted: Runaway Minors Rescued at Railway Station

Web Summary : Two minors fleeing forced child marriage were rescued at Dharashiv station. They were running away to Mumbai from Parbhani. Alert citizens and railway police intervened, preventing a potential tragedy. The girl was pressured to marry on May 7.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव