वळेनंतर सुरू असलेली दुकाने केली बंद
भूम : शहरातील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. मात्र, भूम शहरातील अनेक दुकानदार वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवत हाेते. ही बाब समाेर आल्यानंतर पालिका मुख्याधिकारी चव्हाण यांनी पथकासह रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हाभरातील दुकाने सायंकाळी ४ नंतर सुरू न ठेवण्याचे आदेश आहेत. हा आदेश झुगारणाऱ्यांविरुद्ध कठाेर कारवाई करण्यात येत आहे. असे असतानाही भूम शहरातील अनेक दुकाने वेळेनंतरही सुरू राहत हाेती. हा प्रकार समाेर आल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी चव्हाण शुक्रवारी अचानक पथकासह रस्त्यावर उतरले. वेळेनंतर सुरू असलेली दुकाने बंद केली. यापुढे नियमांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
090721\img-20210709-wa0064.jpg
फोटो भूम शहरातील अस्थापन दिलेल्या वेळेनंतर सुरु आसल्याचे पाहताच न प मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी रस्त्यावर उतरुन दुकाने बंद करा अवाहण करताना सोबत इतर कर्मचारी