भूम: तालुक्यातील गणेगाव येथील विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रभागा सूर्यभान कोकाटे तर व्हाइस चेअरमनपदी विलास कैलास मोरे यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल पिंपरी चिंचवड शिवसेना उपशहर प्रमुख युवराज कोकाटे यांच्या वतीने या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच हभप धर्मराज महाराज सामनगावकर यांच्या वतीने युवराज कोकाटे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सोसायटीचे परमेश्वर सुके, सुसेन जाधव, घनश्याम मोरे, बिभीषण खोत, बाळासाहेब पाटील, बशीर शेख, हनुमंत कोळी, बब्रुवान चव्हाण, अन्नपूर्णा अनभुले, कमल जाधव, मीना बोगाळे, माजी सरपंच भगवान बोगाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अजय कोकाटे यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन कृष्णा पवार यांनी केले तर आभार बाळासाहेब बोगाळे यांनी मानले.
कोकाटे, मोरे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST
भूम: तालुक्यातील गणेगाव येथील विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रभागा सूर्यभान कोकाटे तर व्हाइस चेअरमनपदी विलास कैलास मोरे ...
कोकाटे, मोरे यांचा सत्कार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}