शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची तीव्रता वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST

तुळजापूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने सुरू असलेले देशभरातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी ...

तुळजापूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने सुरू असलेले देशभरातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा यांसारखी विविध आंदोलने करून आंदोलनाची तीव्रता वाढवावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.

तुळजापूर येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील शेतकरी व सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचे सांगून, शेट्टी म्हणाले, चळवळीच्या माध्यमातून तरुणानी एकत्रित येऊन शेती वाचविण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी चळवळ मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, रविकांत तुपकर, प्रा. प्रकाश पोपळे, अमर कदम, अमोल हिप्परगे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले.