शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साखळदंडाने बांधून मूकबधिर कामगाराचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : पळून जाऊ नये म्हणून एका मूकबधिर कामगारास साखळदंडाने जखडून ठेऊन त्याचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा ...

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : पळून जाऊ नये म्हणून एका मूकबधिर कामगारास साखळदंडाने जखडून ठेऊन त्याचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी नळदुर्गजवळील एका ढाब्यावर उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ढाबाचालक व अन्य दोघांवर सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.

नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील चिवरी शिवारात असलेल्या कोहिनूर तांबोळी ढाब्यावर एक मूकबधिर कामगार दोन महिन्यांपासून कामास आहे. तो पळून जाऊ नये म्हणून ढाबामालकाने त्याच्या पायास साखळदंडाने बांधून तंदूर भाजण्याच्या भट्टीवर ठेवत त्याचा शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान, हा प्रकार ढाबाचालकाचा भाऊ हसनलाल रमजान तांबोळी यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी थेट नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून याविषयी तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने सहायक निरीक्षक जगदीश राऊत व कर्मचारी जितेंद्र कोळी यांनी गुरुवारी दुपारी ढाब्यावर जाऊन पाहणी केली असता, मूकबधिर असलेल्या कामगाराच्या पायात साखळदंड आढळून आला. त्यांनी त्यास यातून मुक्त करीत ढाबाचालक अमीर रमजान तांबोळी, परवीन अमीर तांबोळी व रुखमीनबी रमजान तांबोळी यांच्यावर सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित कामगाराचा पत्ता लागेना...

या घटनेतील पीडित तरुण हा मूकबधिर असल्याने त्याचे नाव-गाव समजून आले नाही. नळदुर्ग ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी मूकबधिरांची भाषा समजणाऱ्या व्यक्तीस पाचारण केले होते. मात्र, तोही या तरुणाची मूक भाषा समजू शकला नाही. याविषयी राऊत म्हणाले, पीडित तरुणाच्या कुटुंबीयांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओळख पटल्यानंतर त्यास घरी सोडण्यात येईल.

070121\07osm_1_07012021_41.jpg

पीडित अनोळखी कामगार तरुण