परंडा विधानसभा मतदारसंघातील शहर व तालुकास्तरावरील जिल्ह्याला जोडणारे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. परिणामी दळणवळणासोबतच प्रवासी वाहतूक देखील धोक्यात आलेली आहे. ग्रामीण भागाला जोडणारे रस्त्याची कामे चांगली होऊन दळणवळण व्यवस्था सुधारावी, अशी जनतेतून वारंवार मागणी होत होती. सदरील विषय गांभीर्याने घेऊन माजी आमदार मोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने रस्ते विकास कामासाठी ४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये २१० राष्ट्रीय महामार्ग-सांगोला-पंढरपूर-कुर्डूवाडी परंडा-पाथरूड रस्ता, ५२ राष्ट्रीय महामार्ग ते गिरवली-वालवड-जवळा रस्ता, सोनारी-कंडारी-रोहकल-अंतरगाव -साकत रस्ता, जिल्हा रस्ते बहुला-ईटकूर-मांडवा-देवळाली-मानकेश्वर ते राष्ट्रीय महामार्ग ६२ रस्ता, वाला-साकत-सामनगाव-जवळा-भांडगाव रस्ता, परंडा-खासापुरी-राजुरी-घारगाव रस्ता, परंडा-देवगाव-शिराळा-नालगाव रस्ता, जिल्हा ते शेळगाव-तांदळवाडी रस्ता व जिल्हा सरहद ते शेळगाव-जेकटेवाडी-वाटेफळ रस्ता यांचा समावेश आहे. या रस्त्याच्या विकास सुधारणा कामामुळे तिन्ही तालुक्यातील प्रवास सुखाचा होणार असल्याचे राहुल मोटे यांनी सांगितले.
परंडा मतदार संघातील रस्त्यांसाठी ४६ काेटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST
परंडा विधानसभा मतदारसंघातील शहर व तालुकास्तरावरील जिल्ह्याला जोडणारे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. परिणामी दळणवळणासोबतच प्रवासी वाहतूक देखील धोक्यात ...
परंडा मतदार संघातील रस्त्यांसाठी ४६ काेटींचा निधी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}