जेवळी : रासायनिक खतांच्या अति वापराचा धोका आरोग्यावर होत असून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे काळाची गरज असल्याचे मत शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी व्यक्त केले.
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे खरीप हंगामातील आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. कृषी विभागामार्फत ‘किसान गोष्टी व खरीप हंगाम पीक संरक्षणासाठी रोग व कीड व्यवस्थापन’ यावर हे चर्चासत्र पार पडले. यावेळी तुळजापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे, कृषी पर्यवेक्षक रवी बनजगोळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पीक स्पर्धामध्ये रबी ज्वारीचे दर्जेदार उत्पन्न घेऊन तालुक्यातून दुसरा क्रमांक मिळवलेले महादेव जेवले व तिसरा क्रमांक मिळवणारे संगाप्पा फुंडीपल्ले. त्यांचा सत्कार डॉ. झगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी पर्यवेक्षक रवी बनजगोळे, आत्माचे बी. टी. एम. कैलास पवार, कृषी सहाय्यक सचिन पवार, धनराज कुडूकुले, मुकेश मुळे गावातील प्रगतशील शेतकरी, व महिला शेतकरी उपस्थित होते.