शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आज ५८ केंद्रांवर मिळणार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस ...

उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी ५८ केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४६ केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार आहे, तर १२ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे.

जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. शिवाय, येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा, म्हणून नागरिकही स्वत:हून पुढे येऊन लस घेत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून ग्रामीण तसेच शहरी भागांत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस घेता येणार आहे; तर ४६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध असणार आहे. या केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

या ठिकाणी मिळेल कोव्हॅक्सिन

मुरुम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालये; तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा उपजिल्हा रुग्णालये; जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळेल.

यांना घेता येईल कोविशिल्ड

जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रत्येकी एका उपकेंद्रात लसीकरण मोहीम पार पडणार आहे. उस्मानाबाद शहरातील वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. या केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस घेता येईल.