शिवशक्ती विद्यालयात वृक्ष रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST2021-07-28T04:33:52+5:302021-07-28T04:33:52+5:30

उमरगा : तालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त तसेच कै. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थी ...

Distribution of tree saplings in Shivshakti Vidyalaya | शिवशक्ती विद्यालयात वृक्ष रोपांचे वाटप

शिवशक्ती विद्यालयात वृक्ष रोपांचे वाटप

उमरगा : तालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त तसेच कै. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना लागवडीसाठी वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून नरसिंग करके, अनिलकुमार कुलकर्णी व शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी सुरवसे आदी उपस्थित होते. विद्यालयास ६३९ वृक्ष लागवड करण्याचे उद्देश होते. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यास तीन रोपे व कर्मचाऱ्यांना तीन रोपे याप्रमाणे ५५० वृक्षांचे वाटप करण्यात आले. इतर रोपे याअगोदरच विद्यालयाच्या प्रांगणात रोपण करण्यात आली आहेत. यावेळी प्रकाश बोंडगे यांनी वृक्षांचे महत्त्व सांगत वृक्षांचे चांगले संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यास योग्य बक्षीस देण्याचे जाहीर केले. आभार अजित साळुंके यांनी मानले.

Web Title: Distribution of tree saplings in Shivshakti Vidyalaya