शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
4
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
5
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
6
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
7
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
8
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
9
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
10
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
11
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
12
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
13
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
14
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
15
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
16
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
17
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
18
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
19
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
20
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST

भूम : येथील तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल व गॅस दरवाढी विरोधात शहरात सायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधी घोषणा ...

भूम : येथील तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल व गॅस दरवाढी विरोधात शहरात सायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधी घोषणा देत निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशामध्ये महागाईचा आगडोंब उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्‍यक वस्तू अशा प्रत्येक वस्तूंच्या दरात सातत्याने झालेल्या वाढीने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात कोरोना महामारीमुळे अनेक सामान्य नागरिकांच्या हाताला रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यात ही दरवाढ होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहरातील गोलाई चौक येथून सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली बागवान गल्ली, गांधी चौक, परंडा रोड येथून प्रतीक पेट्रोल पंप येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला. या रॅलीचे आयोजन काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुका काँग्रेस अध्यक्ष रुपेश शेंडगे यांनी केले होते. यात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. सिराज मोगल, जिल्हा युवक सरचिटणीस गणेश शाळू, युवक काँग्रेस अध्यक्ष अण्णा महानवर, विधानसभा कार्याध्यक्ष दत्ता तांबे, विधानसभा उपाध्यक्ष मोईज सय्यद, भूम युवक शहराध्यक्ष राजू साठे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष समी काझी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष बादशाह शेख, भूम शहराध्यक्ष महेमूद पटेल, सुधीर गोरे, प्रभाकर डोंबाळे, सादिक शेख, मयूर उगले, अ‍ॅड. अमृता गाढवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

130721\img-20210713-wa0005.jpg

काँग्रेस रॅली