शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ढोकीत ५१ दात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST

‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमास चांगला प्रतिसाद ढोकी : ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या ...

‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमास चांगला प्रतिसाद

ढोकी : ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत लोकमत व शिवसेना शाखा ढोकी यांच्या वतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ढोकी येथे शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ५१ दात्यांनी सहभाग नोंदवित रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या महायज्ञ रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन आमदार कैलास पाटील व भारतीय जैन संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा कांचनमाला उत्कर्ष संगवे, जयराजे निंबाळकर, ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे, सरपंच नाना चव्हाण, उपसरपंच अमोल समुद्रे, डाॅ. दिग्गज दापके, गोवर्धनवाडीचे उपसरपंच विनोद थोडसरे, कसबे तडवळाचे माजी उपसरपंच तुळशीदास जमाले, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, बाजीराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या शिबिरासाठी भारत देशमुख, समद शेख, गुणवंत देशमुख, शाकीर शेख, वाखरवाडीचे माजी सरपंच नानासाहेब शिंदे, बालाजी सुरवसे, ग्रा. पं. सदस्य धनंजय शिंदे, उमेश शिंदे, दीपक शिंदे, समाधान शिंदे, दत्ता साळुंखे, संतोष कंदले, महेश तिवारी, सतीश तिवारी, फरहान काझी, अमोल तिवारी, अनंत गुरव, शाकेर वस्ताद, महादेव गाढवे, अरुण देशमुख, समीर पठाण, पांडुरंग माळी, बालाजी परदेशी, जीवन घोडके, पवन कोळी, पंकज देशपांडे, निखिल ढवारे, ॲड. तुकाराम शिंदे, पांडुरंग वाकुरे, पोलीसपाटील राहुल वाकुरे, मुसा शेख,आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संग्राम देशमुख, सूत्रसंचालन हनुमंत कोळपे यांनी केले. आभार इम्रान शेख यांनी मानले.

यांनी घेतला सहभाग

या रक्तदान शिबिरात मुस्तफा शेख, लहू शिंदे, रमेश थोडसरे, विनोद थोडसरे, नारायण थोडसरे, सूरज ढवारे, अमर शिंदे, सूरज नाडे, बालाजी सगर, कृष्णा इंगळे, सीताराम शेंडगे, बालाजी शेंडगे, संग्राम देशमुख, पुरुषोत्तम बाहेती, सत्यजित देशमुख, शीतल जाधव, पवन कोळी, सतीश राजपूत, संतोष सोनाळे, राहुल कुलकर्णी-पाटील, बालाजी शिंदे, दिव्या कांबळे, सुहास थोडसरे, संजय भुतेकर, सूरज मोरे, विकास सुर्डी, मंगेश पाटील, गोरख गाढवे, गणेश कवडे, प्रद्युम्न हाजगुडे, पृथ्वीराज कोळी, अजय लोमटे, परवेज काझी, यशवंत कांबळे बालाजी जाधव, विजय लोंढे, एस. एस. ढवारे, आंगद माळी, रामदास दुरांडे, गोविंद पाटील आदींनी रक्तदान केले.