सणसर परिसरात तरुणाचा गळा चिरून खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:16 PM2019-12-05T14:16:40+5:302019-12-05T14:21:08+5:30

कारण अस्पष्ट

Young man killed in baramati area | सणसर परिसरात तरुणाचा गळा चिरून खून 

सणसर परिसरात तरुणाचा गळा चिरून खून 

Next

कळस : सणसर (ता इंदापुर )जवळील ३९ फाटा येथे रमजान लालसाहेब शेख वय (३०) या तरूणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खुन केल्याची घटना घडली .
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९ फाटा येथील वर्कशॉप मध्ये बुधवारी रात्री रमजान शेख झोपले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून गुरूवारी पहाटे खुन करण्यात आला आहे. घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटे घेण्यात आले आहे .फुटेजमध्ये याबाबत तपास उघड होण्याची शक्यता आहे .
सदर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देवुन तपासास सुरूवात केली आहे .
शेख हा जाचकवस्ती येथील रहिवासी असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता .शेख यांचा मृतदेह लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे.

Web Title: Young man killed in baramati area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.