तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 21:14 IST2025-06-09T21:13:27+5:302025-06-09T21:14:04+5:30

काल तर पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा चेहरा लावून एआयद्वारे बनविलेला नग्न फोटो व्हायरल करण्यात आला होता. असे काही आपल्या आयुष्यात झाले तर मुली काय करतात, लाजेखातर आयुष्य संपविण्याचा प्रयत्न करतात किंवा या लोकांच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडतात.

Young ladies, if your private photos are leaked, don't panic, you can delete them immediately...; Take help from this website... | तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 

तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 

आजकाल मोबाईल, सोशल मीडियाच्या दुनियेत कोणाचे कसले फोटो व्हायरल होतील याचा नेम नाही. काल तर पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा चेहरा लावून एआयद्वारे बनविलेला नग्न फोटो व्हायरल करण्यात आला होता. असे काही आपल्या आयुष्यात झाले तर मुली काय करतात, लाजेखातर आयुष्य संपविण्याचा प्रयत्न करतात किंवा या लोकांच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडतात. परंतू जर असे झाले तर महिलांनो घाबरू नका, तुमच्यासाठी एक संस्था काम करत आहे. 

जर कोणाचे खासगी फोटो लीक झाले, अश्लील फोटो लीक केले गेले, सोशल मीडिया असेल किंवा पॉर्न साईट यावरून हटविण्याचा या संस्थेचा हातखंडा आहे. आजवर या संस्थेने २ लाखांहून अधिक फोटो इंटरनेटवरून हटविले आहेत. या संस्थेचा हे फोटो डिलीट करण्याचा दर हा ९० टक्के आहे. म्हणजे केवळ १० टक्केच प्रकरणांत अपयश आलेले आहे. ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे SWGfL. 

या संस्थेची मोफत सुविधा StopNCII.org या वेबसाईटवर मिळते. ही बातमी वाचणारे वाचक महिला असेल किंवा पुरुष दोघांनीही ही माहिती लक्षात ठेवा, तुमच्या मैत्रिणी, बहीण किंवा मित्रांना लगेचच पाठवा. एखाद्याचे अख्खे आयुष्य यावर अवलंबून आहे. अख्खे कुटुंब अशा प्रकारांमुळे उध्वस्त होऊ शकते. StopNCII म्हणजे स्टॉप नॉन-कन्सेन्सुअल इंटिमेट इमेज अ‍ॅब्यूज (Stop Non-Consensual Intimate Image Abuse) आहे. SWGfL चा भाग असलेल्या रिव्हेंज पॉर्न हेल्पलाइनद्वारे हे टूल चालवले जाते.

या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमची तक्रार द्यावी लागणार आहे. यामध्ये तुमचे तसले फोटो असलेली पोस्टची लिंक किंवा व्हिडीओ द्यावा लागतो. एक हॅशिंग अल्गोरिदम वापरला जातो आणि त्याद्वारे त्याची एक व्हॅल्यू तयार केली जाते व आपल्या सोबत असलेल्या जगभरातील कंपन्यांना ती पाठविली जाते. यानंतर ती हॅशव्हॅल्यू ज्या कंटेंटसोबत मॅच होईल तो कंटेंट हटविला जातो. एवढेच नाही तर भविष्यात जरी कोणी तुमच्या नावाने किंवा त्या संदर्भाने सर्च केले किंवा काही तसेच अपलोड केले तरी ते डिलीट केले जाते. ही प्रक्रिया निरंतर सुरुच राहते. या संस्थेची साथ फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक, पॉर्नहब, ओन्ली फॅन्स सारख्या मोठमोठ्या वेबसाईटही देत आहेत. यामुळे तरुणींनो असले काही तुमच्यासोबत घडले तर घाबरून जाऊ नका, ही वेबसाईट पहा आणि आताच तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर देखील करा...

Web Title: Young ladies, if your private photos are leaked, don't panic, you can delete them immediately...; Take help from this website...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.