Yes Bank : राजीव गांधींचे 'ते' अती महागडे पेंटिंग अखेर ईडीच्या ताब्यात; राणा कपूरच्या होते मालकीचे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 09:45 PM2020-03-09T21:45:02+5:302020-03-09T21:51:15+5:30

Yes Bank : युपीए सरकारच्या कार्यकाळात प्रियंका गांधी यांच्या पेंटीग्सला राणा कपूर यांनी 2 कोटी रुपयांत खरेदी केले होते

Yes Bank : Rajiv Gandhi's 'expensive' painting is finally seized by ED; Owned by Rana Kapoor pda | Yes Bank : राजीव गांधींचे 'ते' अती महागडे पेंटिंग अखेर ईडीच्या ताब्यात; राणा कपूरच्या होते मालकीचे

Yes Bank : राजीव गांधींचे 'ते' अती महागडे पेंटिंग अखेर ईडीच्या ताब्यात; राणा कपूरच्या होते मालकीचे

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१० साली जून महिन्यात राजीव गांधी यांच्या पेंटिंगच्या विक्रीबाबत प्रियंका गांधी-वाड्रा यांनी राणा कपूर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. Yes Bank चे माजी सीईओ राणा कपूर यांनी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडून हे महागडे पेंटिंग विकत घेतले होते.

मुंबई - Yes Bank चे माजी सीईओ राणा कपूर यांच्या मुंबईतल्या वरळी स्थित(समुद्र महल) घरावर अंमलबजावणी (ईडी) संचालनालयाने छापेमारी केली. तत्पूर्वी ईडीनं डीएचएफएलच्या कपिल धवन यांना मनी लाँड्रिंग प्रकरण आणि गँगस्टर इक्बाल मिरचीशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटक केली. आता, न्यायालयाने राणा कपूर यांना ईडीच्या कोठडीत पाठवले आहे. याप्रकरणात आता भाजपाने काँग्रेसला खेचले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राणा कपूर यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप भाजपाने उघड केल्यानंतर आता राणा यांनी २ कोटींना विकत घेतलेले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे पेंटिंग ईडीने जप्त केले आहे.
Yes Bank चे माजी सीईओ राणा कपूर यांनी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडून हे महागडे पेंटिंग विकत घेतले होते. यासाठी २०१० साली जून महिन्यात राजीव गांधी यांच्या पेंटिंगच्या विक्रीबाबत प्रियंका गांधी-वाड्रा यांनी राणा कपूर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे प्रियंका गांधी-वाड्रा आणि राणा यांच्यात कोटींचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. 

 

Yes Bank : सीबीआयने राणा कपूर यांच्या संबंधित 'या' सात ठिकाणी केली छापेमारी 

 

युपीए सरकारच्या कार्यकाळात प्रियंका गांधी यांच्या पेंटीग्सला राणा कपूर यांनी 2 कोटी रुपयांत खरेदी केले होते, असे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिले आहे. सध्या, आयटी विभागाकडून याबाबत तपास सुरू आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही हा व्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, प्रियंका गांधी आणि राणा कपूर यांच्यात लिंक असल्याचे काँग्रेसला मान्य नाही. पेटींग्स विकणारा आणि खरेदी करणारा यांच्यातला हा आर्थिक व्यवहार आहे. याचा प्रियंका गांधींशी काहीही संबंध नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. जर नरेंद्र मोदींनी हे पेंटिंग खरेदी केलं असतं तर तुम्ही काय म्हणाला असता? हे सरकार प्रियांका गांधीच चालवतात, असे तुम्ही म्हटले असते का?, असे प्रश्न काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी उपस्थित केले होते.

Yes Bank: काय सांगता? CEO राणा कपूरने प्रियंका गांधींचे पेंटीग्स 2 कोटी रुपयांना घेतले

 

Web Title: Yes Bank : Rajiv Gandhi's 'expensive' painting is finally seized by ED; Owned by Rana Kapoor pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.