शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; दोन वर्षांनंतर मयत डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:31 IST

उपचारात हयगय केल्याचा आरोप

ठळक मुद्देदोन वर्षांनंतर गुन्हा दाखल यादरम्यान डॉक्टरांचे झाले निधन

मुक्रमाबाद :  उपचारादरम्यान महिलेचा झालेल्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र बाºहाळी येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी रेणुकादास चेरके यांच्याविरुद्ध दोन वर्षानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.  मात्र या दरम्यान, चेरके यांचे निधन झाले होते. मयताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली.

रमा शिवाजी कदम (वय २५ रा. माकणी ता. मुखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, २७ जुलै २०१७ रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बाºहाळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदरील महिलेची नैसर्गिक प्रसूती झाल्याने तिची तपासणी न करता तत्कालीन वैद्यकीय अधिकारी रेणुकादास चेरके यांनी तिला डिस्चार्ज दिला. या दरम्यान महिलेची प्रकृती जास्तच खालावल्याने सकाळी १०.३० च्या दरम्यान तिला उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे नेण्यात आले. तेथे महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर मयत महिलेच्या  नातेवाईकांनी वैद्यकीय अधिका-यांवर गुन्हा दाखल  करण्याची मागणी करुन तशी फिर्याद मुखेड पोलिसांत दिली. पोलिसांनी संबंधित अर्ज मुक्रमाबाद ठाण्याकडे वर्ग केला. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलिसांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे चौकशी करुन तसा अहवाल द्यावा, असे लेखी पत्र दिले.

मध्यंतरीच्या काळात मे २०१९ मध्ये या प्रकणातील वैद्यकीय अधिकारी रेणुकादास चेरके यांचे आजाराने निधन झाले.  पोलिसांना शल्यचिकीत्सक यांच्याकडील अहवाल मिळाला. अखेर १९ नोव्हेंबर रोजी चेरके यांच्याविरुद्ध मुक्रमाबाद पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती ठाणे अंमलदार माधव मरगेवाड यांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकड गडीमे यांच्या मार्गदर्शनाखली फौजदार गोपीनाथ वाघमारे तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर