शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

खळबळजनक! महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चाकूने भोसकण्याचा केला प्रयत्न

By पूनम अपराज | Published: October 23, 2020 6:11 PM

Stabbing : महिला आणि रिक्षाचालकाने परस्परांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देमंजीती कौर-भोसले (५०) या दुचाकीवरून चालल्या होत्या. त्यांच्या दुचाकीची धडक दुर्गेश पाटील (वय ३५) याच्या रिक्षाला लागली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

विरार - शाब्दिक बाचाबाचीनंतर एका चिडलेल्या महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला. विरारमध्ये मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.विरारच्या अगरवाल सिटी परिसरात ही घटना घडली. महिला आणि रिक्षाचालकाने परस्परांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.विरारच्या पश्चिमेकडे दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंजीती कौर-भोसले (५०) या दुचाकीवरून चालल्या होत्या. त्यांच्या दुचाकीची धडक दुर्गेश पाटील (वय ३५) याच्या रिक्षाला लागली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दुर्गेशने रागाच्या भरात महिलेच्या कानाखाली लगावली. त्यानंतर संतापलेल्या महिलेने तिच्याजवळील किर्पाण बाहेर काढला आणि दुर्गेशच्या पोटात भोकसण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या इतर रिक्षाचालकांनी मोबाइलमध्ये काढला. महिला आणि रिक्षाचालकांमध्ये जोरदार वाद झाला. व्हिडिओत इतर रिक्षाचालक त्या महिलेला जाण्यास आणि चाकू ठेवण्यास विनंती करत आहेत. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर हात उगारल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या वादानंतर रिक्षाचालक आणि संबंधित महिला अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी परस्परांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

टॅग्स :Policeपोलिसauto rickshawऑटो रिक्षाVirarविरारCrime Newsगुन्हेगारी