शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानातून आलेले कोट्यवधींचे हेरॉइन जप्त; मुंबईत महिलेला अटक, २१ कोटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:19 IST

राजस्थानच्या प्रतापगड, चित्तोडगढ येथून अफूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे व्यापारी मुंबईत रेल्वे व बसमार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती एएनसीच्या घाटकोपर युनिटच्या पोलीस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती.

मुंबई : राजस्थानमधून मुंबईत विक्रीसाठी आणलेले २१ कोटी ६० लाख किमतीचे ७ किलो हेरॉइन गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) जप्त केले आहे. याप्रकरणी मानखुर्दच्या अमीना हमजा शेख ऊर्फ  लाली (५३) या महिलेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.राजस्थानच्या प्रतापगड, चित्तोडगढ येथून अफूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे व्यापारी मुंबईत रेल्वे व बसमार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती एएनसीच्या घाटकोपर युनिटच्या पोलीस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती. हा ड्रग्जचा व्यवहार सायन कोळीवाडा येथील वडाळा  टर्मिनल येथे होणार असल्याने पोलिसांना सापळा रचत लाली हिला ताब्यात घेतले. तिच्या झडतीत ७ किलो २०० ग्रॅम हेरॉइन मिळून आले आहे. लाली ही अभिलेखावरील गुन्हेगार आहे. मुंबईत यापूर्वीदेखील तिच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. ती मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंडमध्ये राहते.  हे तस्कर मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना ड्रग्ज विकणार होते.  त्यापूर्वीच गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई केली आहे. लाली हिने  राजस्थानच्या देवलाई, नौगामा येथून हे ड्रग्ज मागवले होते. हेरॉईनची तस्करी करणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांची नावे लालीच्या चौकशीत समोर आली आहेत.  त्यानुसार, पथकाचा तपास सुरू आहे. एएनसीचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान बनतेय ड्रग्ज तस्करांचे केंद्रएएनसीने ड्रग्ज तस्कराविरोधात धडक कारवाई करत, यावर्षी हेरॉइन तस्करीच्या  ८ मोठ्या कारवाईत ९ जणांना जेरबंद केले आहे.  यातील तीन आरोपी हे राजस्थानचे मोठे ड्रग्ज पुरवठादार आहेत. या तिघांकडून पोलिसांनी १६ किलो  हेरॉइन जप्त केले होते. ज्याची बाजारात किंमत ४४ कोटी इतकी आहे.  या कारवाईवरून राजस्थान हे तस्करांचे मोठे केंद्र बनत असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ