शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी सहायक आयुक्तांवर गुन्हा; निष्काळजीपणाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:08 IST

इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : अनधिकृत इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची दुर्घटना दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. या इमारत दुर्घटना प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट तीनने या घटनेच्या तपासात मनपाचे प्रभाग समिती (सी)चे सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

विरारच्या विजयनगर परिसरात असलेली रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत २६ ऑगस्ट २०२५ रोजी कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता तर ९ जण जखमी झाले होते. ही चार मजली अनधिकृत इमारत होती. यात ५० सदनिका होत्या. मात्र, अवघ्या काही वर्षांतच ही इमारत जीर्ण आणि धोकादायक बनली होती. विकासकाने रहिवाशांची दिशाभूल करून इमारत अधिकृत असल्याचे भासवले होते. त्यामुळे रहिवासी कर भरत होते. या दुर्घनटेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल साने आणि जागा मालकासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

...तर १७ जणांचा जीव वाचला असता

पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडे सोपवला आहे. विकासक नितल साने (४८) अद्याप तुरुंगात आहे. गुन्हे शाखेच्या तपासामध्ये असे दिसून आले की, सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांनी इमारतीला नोटीस पाठवली. परंतु, इमारत वेळेत रिकामी केली असती तर १७ जण वाचले असते.

चार हजार पानांचे आरोपपत्र

गुन्हे शाखा युनिट तीनने या संपूर्ण प्रकरणात पुरावे आणि जबाबांच्या आधारावर चार हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणात मनपाच्या इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू असून, त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल, असे गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Virar Building Collapse: Assistant Commissioner Booked for Negligence in Tragedy

Web Summary : Following the Virar building collapse that killed 17, an assistant commissioner has been booked for negligence. Despite issuing a notice, failure to evacuate the building in time led to the tragic loss of life. An investigation continues into other involved officials.
टॅग्स :VirarविरारBuilding Collapseइमारत दुर्घटनाDeathमृत्यू