Video : राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पोलिसांनी पकडला संशयित पाकिटमार

By पूनम अपराज | Published: March 5, 2021 02:24 PM2021-03-05T14:24:58+5:302021-03-05T14:55:39+5:30

Suspected Pickpocket in police custody : त्याला इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले आहे. 

Video: Police detained suspected pickpocket during Raj Thackeray's visit in Nashik | Video : राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पोलिसांनी पकडला संशयित पाकिटमार

Video : राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पोलिसांनी पकडला संशयित पाकिटमार

Next
ठळक मुद्देराज ठाकरे यांना भेटण्यासाठी,पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा उचलत एका पाकिटमारानं हातसफाई करण्याचा इरादा केला.

नाशिक- नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात एका चोरट्याने चांगली साफसफाई केली आणि जवळपास तीन कार्यकर्त्यांची पाकीट चोरले. त्यापैकी एका कार्यकर्त्याला अंदाज आल्यानंतर त्याने धावपळ केली आणि एका संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टाच्या विवाह सोहळ्यासाठी राज ठाकरे सुमारे वर्षभरानंतर नाशिकला आले आहेत. त्यामुळे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ठाकरे यांच्या स्वागतासाठी पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे मोठी गर्दी झाली होती.


 राज ठाकरे आल्याने त्यांच्या स्वागतासाठी नेते आणि कार्यकर्ते गर्दी करून उभे असतानाच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांची पाकीट मारले गेली विशेष म्हणजे याठिकाणी पोलीस देखील बंदोबस्तास उपस्थित होते एका कार्यकर्त्याला पाकिट मारल्या नंतर तात्काळ लक्षात आले आणि त्यांनी आजूबाजूला तपासल्यावर एका व्यक्तीवर त्याला संशय आला. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर हा व्यक्ती पळून जाऊ लागताच त्याने आणि त्याच्या इतर काही कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र त्याच्याकडे पाकीट आले नसल्याने त्याने ती फेकून दिले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला या व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे. इंदिरा नगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

 


 दरम्यान या ठिकाणी किमान तीन कार्यकर्त्यांचे पाकीट चोरीला गेले असं कार्यकत्र्यांनी सांगितलं. मध्यंतरी नाशिक मध्ये आमदार दिलीप बनकर यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख नाशिकमध्ये आले होते त्यावेळी विवाह सोहळ्यात नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे देखील पाकीट चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पाकीट मारण्याचे प्रकार सर्रास होत आहेत राज ठाकरे यांच्या या  आधीच्या नाशिक दौर्‍यात देखील असे अनेक प्रकार घडलेले आहेत

Web Title: Video: Police detained suspected pickpocket during Raj Thackeray's visit in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.