आरोपमुक्तीसाठी वाझेचा विशेष न्यायालयात अर्ज; कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 07:01 IST2026-03-11T07:01:28+5:302026-03-11T07:01:40+5:30

वाझेने अर्जात म्हटले आहे की, पोलिस अधिकारी म्हणून आपल्याला माहिती होते की अंबानी कुटुंब भारतातील सर्वाधिक सुरक्षा लाभलेले कुटुंब आहे.

Vaze's application for acquittal in special court; While arguing in court, he said... | आरोपमुक्तीसाठी वाझेचा विशेष न्यायालयात अर्ज; कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले... 

आरोपमुक्तीसाठी वाझेचा विशेष न्यायालयात अर्ज; कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले... 

मुंबई : दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच्या प्रकरणात माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याने  विशेष न्यायालयात आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास आधार नसल्याचा दावाही त्याने केला आहे. 

सोमवारी दाखल केलेल्या अर्जात वाझेने म्हटले आहे की, त्यांच्या विरोधातील कार्यवाहीसाठी ‘अधिकार क्षेत्राचा अभाव’आहे आणि त्यामुळे ती कार्यवाही कायद्याच्या दृष्टीने अवैध आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही आढळून आली होती. या गाडीचा ताबा असलेले व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च २०२१ रोजी ठाणे येथील खाडीत आढळला होता. या प्रकरणात वाझे याला मार्च २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

वाझेने अर्जात म्हटले आहे की, पोलिस अधिकारी म्हणून आपल्याला माहिती होते की अंबानी कुटुंब भारतातील सर्वाधिक सुरक्षा लाभलेले कुटुंब आहे. त्यामुळे कमी दर्जाच्या स्फोटकांच्या साहाय्याने त्यांना धमकावणे हा ‘अत्यंत मूर्खपणाचा गुन्हा’ असून असा प्रकार करण्याचा विचारही आपण केला नाही. वाझेने यूएपीए अंतर्गत खटला चालविण्यासाठी दिलेली मंजुरी वैध नाही तसेच या प्रकरणात ‘दहशतवादी कृत्य झाले’ हे सिद्ध करणारा कोणताही कायदेशीर पुरावा सादर करण्यात आलेला नाही, असे अर्जात नमूद केले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, वाझेने ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून  दबाव निर्माण करण्यासाठी इतर आरोपींसोबत कट रचून अंबानीच्या घराजवळ वाहन उभे केले. मात्र, अंबानी कुटुंबातील कोणालाही मृत्यूची भीती वाटली होती, असा कोणताही पुरावा नोंदीत नसल्याचे वाझे याने अर्जात म्हटले आहे. 

Web Title : एंटीलिया बम मामले में सचिन वाजे ने आरोपमुक्ति की मांग की।

Web Summary : सचिन वाजे ने एंटीलिया बम मामले में आरोपमुक्ति की मांग करते हुए यूएपीए के आधार की कमी का दावा किया। उन्होंने तर्क दिया कि उनके अभियोजन में अधिकार क्षेत्र का अभाव है और यूएपीए की मंजूरी अमान्य है, अंबानी परिवार में आतंकवादी कृत्य या भय का कोई प्रमाण नहीं है।

Web Title : Sachin Waze seeks discharge in Antilia bomb scare case.

Web Summary : Sachin Waze seeks discharge in the Antilia bomb scare case, claiming lack of UAPA grounds. He argues his prosecution lacks jurisdiction and the UAPA sanction is invalid, citing no proof of terrorist act or fear within the Ambani family.