UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:12 IST2026-05-04T16:01:58+5:302026-05-04T16:12:40+5:30

मध्य प्रदेशात एका शिक्षिकेचे त्याच्याच विद्यार्थ्याने अपहरण करुन लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

UPSC Mentor Shubhra Ranjan Held Hostage and Robbed of 1.90 Crore Former Student Arrested from Hospital ICU | UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर

UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर

UPSC Shubhra Ranjan: इशिता किशोर आणि टीना डाबी यांसारख्या अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या शुभ्रा रंजन यांच्यासोबत भोपाळमध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. त्यांच्याच एक माजी विद्यार्थी प्रियांक शर्मा याने कोचिंग सेंटरच्या नावाखाली त्यांना जाळ्यात ओढून पिस्तूलच्या धाकावर तब्बल १ कोटी ९० लाख रुपये लुटले आहेत. प्रियांक शर्माने साथीदारांच्या मदतीने शुभ्रा रंजन यांचे अपहरण केलं होतं.

नव्या सेंटरचे आमिष दाखवून रचला सापळा

शुभ्रा रंजन यांना भोपाळमध्ये नवीन कोचिंग सेंटर सुरू करण्याचे आमिष दाखवून प्रियांकने दिल्लीहून भोपाळला बोलावले. तो स्वत: २०१६ मध्ये त्यांच्याकडे शिकला होता आणि त्यांना गुरु मानत होता. भोपाळमधील हॉटेल ताजमध्ये सुरुवातीची भेट झाल्यानंतर, त्याने त्यांना बागसेवनिया येथील एका भाड्याच्या फ्लॅटवर नेले.

पिस्तूलचा धाक आणि 'सुंदरकांड'चा बनाव

तपासानुसार, प्रियांकने दतिया आणि रीवा येथून गुंड बोलावले होते. ज्या फ्लॅटमध्ये शुभ्रा रंजन यांना बंधक बनवले तिथेच आरोपीने आदल्या दिवशी मुद्दाम सुंदरकांड पठणाचे आयोजन केले होते. जेणेकरून ओरडण्याचा किंवा झटापटीचा आवाज कोणालाही ऐकू येऊ नये. तिथे पिस्तूल दाखवून धमकावत त्याने शुभ्रा रंजन यांच्याकडून तीन वेगवेगळ्या बँक खात्यात १ कोटी ९० लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले.

पोलिसांना फसवण्यासाठी तयार केला खोटा व्हिडिओ

आरोपीने केवळ लूटच केली नाही, तर एक बनावट व्हिडिओ देखील शूट केला. यात शुभ्रा रंजन आणि त्यांच्या पतीनेच प्रियांकच्या एका साथीदाराचे अपहरण केल्याचे भासवण्यात आले होते. जर प्रकरण पोलिसांत गेले, तर शुभ्रा रंजन यांनाच आरोपी ठरवण्यासाठी हा कट रचला होता.

एम्सच्या ICU मध्ये लपला होता मास्टरमाइंड

गुन्हा केल्यानंतर प्रियांक शर्मा आजारी असल्याचे नाटक करत एम्स भोपाळच्या आयसीयूमध्ये भरती झाला. तिथूनच तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, क्राईम ब्रँचने तांत्रिक तपास करून त्याला रुग्णालयातूनच अटक केली. यावेळी त्याच्या पत्नीने आणि आईने मोठा गोंधळही घातला.

का केली ही लूट?

पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, प्रियांकने शुभ्रा रंजन यांची फ्रँचायझी घेऊन भोपाळमध्ये कोचिंग सुरू केले होते, पण कोविड काळात त्याला मोठे नुकसान झाले आणि सेंटर बंद पडले. याच आर्थिक नुकसानीतून त्याने आपल्याच शिक्षिकेला लुटण्याचा कट रचला.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत प्रियांक शर्मा, दीपक भगत, रोहित मालवीय, विकास उर्फ विक्की दाहिया, कुणाल यादव आणि पंकज अहिरवार या सहा आरोपींना अटक केली आहे. तर रामजी प्रजापति आणि रामू उर्फ रामेश्वर यांचा शोध सुरू आहे.

Web Title : UPSC टॉपर शिक्षिका का अपहरण, पूर्व छात्र ने लूटे 1.9 करोड़

Web Summary : भोपाल में UPSC कोच शुभ्रा रंजन का अपहरण कर एक पूर्व छात्र ने 1.9 करोड़ रुपये लूटे। कोचिंग सेंटर का लालच देकर बंदूक की नोक पर वारदात को अंजाम दिया। बीमारी का नाटक कर बचने की कोशिश की, लेकिन गिरफ्तार हो गया।

Web Title : UPSC Teacher Kidnapped, Robbed by Ex-Student; Rs 1.9 Crore Stolen

Web Summary : UPSC coach Shubhra Ranjan was kidnapped and robbed of ₹1.9 crore by a former student in Bhopal. The student lured her with a coaching center offer, then held her at gunpoint. He faked illness to evade capture but was arrested.