शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

माहीम, शिवाजी पार्क परिसरात सेल्समन असल्याची बतावणी करून करत होते घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 21:45 IST

दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक फ्लॅट फोडून ७० सोने तोळे व रोकड लंपास केली होती.ज्ञानशेखर आप्पादुराई शेट्टी (वय ३७, रा दिवा, ठाणे), मोहन आरमुगम शेट्टी (२७, रा. कांजूरमार्ग) व त्याच्या भाऊ लोकनाथ उर्फ आरमुगम (२३) अशी त्यांची नावे आहेत.

मुंबई - भरदिवसा फ्लॅट, बंद दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या एका सराईत टोळीचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाला यश आले आहे. कांजूरमार्ग परिसरात दोघा भावासह तिघांना अटक करुन त्यांच्याकडून मुंबई व परिसरातील घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ज्ञानशेखर आप्पादुराई शेट्टी (वय ३७, रा दिवा, ठाणे), मोहन आरमुगम शेट्टी (२७, रा. कांजूरमार्ग) व त्याच्या भाऊ लोकनाथ उर्फ आरमुगम (२३) अशी त्यांची नावे आहेत. वॉचमन व सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या अपार्टमेंट, बिल्डीगमध्ये ते सेल्समन असल्याचे भासवून जात, कटावणी व स्क्रू डायव्हरच्या सहाय्याने फ्लॅटचे दरवाजे उचकटून घरफोडी करीत असल्याचे विभागाचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.

मालमत्ता कक्षातील प्रभारी सतीश मयेकर, सहाय्यक निरीक्षक सुनील माने यांना विक्रोळी- जोगेश्वरी लिंक रोड कांजूर मार्ग परिसरात घरफोडी करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी परिसरात सापळा रचला. संशयास्पदरित्या आढळून आलेल्या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे कटावणी, स्क्रू ड्रायव्हर व अन्य साहित्य मिळून आले. चौकशीमध्ये त्यांनी शिवाजी पार्क व माहिम परिसरातील फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक फ्लॅट फोडून ७० सोने तोळे व रोकड लंपास केली होती.

ज्ञानेश्वर शेट्टी याच्याविरुद्ध मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी घरफोडी, दरोडा जबरी चोरीचे आदीचे ३५ गुन्हे दाखल आहेत. मोहन शेट्टीवर १६ तर त्याचा भाऊ लोकनाथ यांच्यावर १२ गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

टॅग्स :RobberyचोरीArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई