शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 00:48 IST

Sneha Debnath News : ७ दिवसांपासून बेपत्ता होती स्नेहा, कॅबवाल्याने सिग्नेचर ब्रिजवर सोडलं...

दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवरून बेपत्ता झालेल्या स्नेहा देबनाथचा मृतदेह पोलिसांना सापडला. गीता कॉलनीच्या उड्डाणपुलाजवळ यमुना नदीतूनपोलिसांनी स्नेहाचा मृतदेह ताब्यात घेतला. गेल्या ७ दिवसांपासून पोलीस स्नेहाचा शोध घेत होते. स्नेहा बेपत्ता झाल्याची तक्रार मेहरौली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. स्नेहा ७ जुलै रोजी तिच्या मैत्रिणीला रेल्वे स्टेशनवर सोडायला जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. आज तिचा मृतदेह सापडला.

नक्की काय घडलं?

स्नेहा देबनाथचे कुटुंब मूळचे त्रिपुराचे आहे. स्नेहा दक्षिण दिल्लीतील मेहरौली पोलिस स्टेशन परिसरातील पर्यावरण कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. ७ जुलै रोजी ती तिच्या आईला सांगून घरातून निघाली की ती तिची मैत्रीण पटुनियाला स्टेशनवर सोडायवा जात आहे. कॅब ड्रायव्हरने स्नेहाला दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवर सोडले. त्यानंतर ती तिथून बेपत्ता झाली. कुटुंबाने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कुठेही सापडली नाही.

शेवटचे ठिकाण सिग्नेचर ब्रिज

काही काळ वाट पाहून ९ जुलै रोजी त्यांनी मेहरौली पोलिस ठाण्यात स्नेहा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्नेहाचा शोध सुरू केला. यमुना नदीत पोलीस तिचा सतत शोध घेत होते. बेपत्ता होण्यापूर्वी तिने घरात एक सुसाईड नोटही सोडली होती, ज्यामध्ये तिने आत्महत्या करण्याबद्दल लिहिले होते. मेहरौली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्नेहाचे शेवटचे ठिकाण सिग्नेचर ब्रिजवर सापडले.

यमुना नदीतून मिळाला स्नेहाचा मृतदेह

रविवारी गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळील यमुना नदीतून पोलिसांना एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख स्नेहा अशी झाली, जी ७ दिवसांपासून बेपत्ता होती. मृतदेह सापडल्यापासून कुटुंबाला धक्काच बसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसriverनदीTripuraत्रिपुरा