शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 07:27 IST

आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आपला खूप मोठा राजकीय धक्का बसला आहे. आपचे खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला. 

पक्षांतरासाठी आवश्यक दोन तृतीयांश खासदार या गटाकडे असल्याने त्यांची ही कृती अवैध ठरणार नाही व त्यांना अपात्रही ठरविले जाणार नाही. या पक्षांतराच्या घटनेमुळे भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. आपल्या निर्णयाबद्दल माहिती देण्यासाठी चड्ढा, मित्तल व पाठक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये आपच्या कारभारावर टीक करत चढ्ढा यांनी आम्ही सात जण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. 

पक्ष का सोडताय? हे सांगताना राघव चढ्ढा म्हणाले... 

मी माझे रक्त आणि घाम तसेच माझ्या तरुणाईपैकी १५ वर्षांचा कालावधी देऊन उभा केलेला आप पक्ष आपल्या तत्त्व, मूल्ये, मूळ नैतिक भूमिकेपासून पूर्णपणे दूर गेला आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आप पक्ष आता देशासाठी नाही, तर स्वतःच्या फायद्यासाठी काम करीत आहे. गेल्या काही वर्षांत मला, असे वाटू लागले होते की मी योग्य व्यक्ती असलो तरी आपसारख्या चुकीच्या पक्षात कार्यरत आहे. त्यामुळेच मी आपपासून दूर जाण्याचा आणि जनतेची अधिक जवळून सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा खासदार संदीप पाठक म्हणाले की, आपमधून बाहेर पडावे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, असे कधी वाटलेही नव्हते. गेली १० वर्षे मी या पक्षाशी जोडलेला होतो.

वादाचे मुद्दे काय होते?

राघव चड्ढा: हे 'आप'चे अत्यंत तरुण आणि प्रमुख चेहरा होते. पंजाबमधील पक्षाच्या विजयात आणि रणनीतीत त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राज्यसभेत आपच्या उपनेतेपदावरून राघव चड्ढा यांना नुकतेच हटवण्यात आले होते आणि त्यांच्या जागी मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

अशोक मित्तल : हे 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'चे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वीच 'आप'ने त्यांची राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती. १५ एप्रिल रोजी ईडीने पंजाबमध्ये आपचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्याशी संबंधित व्यावसायिक संस्थांवर फेमाच्या चौकशीअंतर्गत छापे टाकले होते. तेही भाजपमध्ये सामील झाले आहेत.

स्वाती मालीवाल : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेत पक्षाने आपली बाजू न घेतल्याने आणि आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप करत मालीवाल यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतली होती.

अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

आमच्या सात राज्यसभा खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या सर्व कृत्यांमागे असलेल्या भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमख अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

पक्षांतरबंदी कायद्याचे गणित काय सांगते?

एखाद्या पक्षात फूट मान्य होण्यासाठी आणि अपात्रतेपासून वाचण्यासाठी राज्यसभेत त्या पक्षाच्या किमान दोन-तृतीयांश (२/३) सदस्यांचा पाठिंबा लागतो. आपचे राज्यसभेतील एकूण सदस्य = १० किमान ७ खासदार एकत्र आले, तरच ही फूट वैध ठरेल. चड्ढा यांना ७/१० खासदारांचा पाठिंबा मिळाल्यासच, पक्षांतर विरोधी कायद्यापासून वाचत भाजपमध्ये जाणे शक्य होईल. म्हणजेच, आपच्या राज्यसभा गटातील सुमारे ७०% सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AAP Faces Rajya Sabha Split: 7 MPs Join BJP

Web Summary : Seven AAP Rajya Sabha MPs, including Raghav Chadha, defected to BJP, causing a major blow. Chadha cited disillusionment with AAP's values, while Kejriwal accused BJP of betraying Punjab. The defection meets legal requirements, avoiding disqualification.
टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालRaghav Chadhaराघव चड्ढा