धक्कादायक! कुऱ्हाडीचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:23 PM2020-08-05T19:23:03+5:302020-08-05T19:24:16+5:30

आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

Shocking! Sexual harrashment of minor girl from showing fear of weopan | धक्कादायक! कुऱ्हाडीचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार

धक्कादायक! कुऱ्हाडीचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार

Next

पिंपरी : आई आणि भाऊ यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्याला आळंदीपोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ जुलै रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान ठाकरवस्ती याठिकाणी घडली. आरोपी याने फिर्यादी यांच्या आई व भाऊ यांना कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पीडित मुलगी अल्पवयीन आहेत हे माहिती असताना देखील तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या आई व भावास जीवे मारण्याची धमकी देत असल्याने फिर्यादी तक्रार दाखल करण्यास घाबरत होत्या.आरोपी बाहेर गेल्यावर फिर्यादीने अल्पवयीन मुलीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

Web Title: Shocking! Sexual harrashment of minor girl from showing fear of weopan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.