शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेयसीच्या आई व बहिणीला जाळण्यासाठी 'तो' पेट्रोल घेऊन आला होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:27 IST

लग्न मोडल्याचा राग ठेवून मुलीच्या आईवर व लहान बहिणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडला

ठळक मुद्देया प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.अखेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास आरोपीस पालघर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले गेले.

पालघर - लग्न मोडल्याचा राग मनात खदखदत असल्याने सूडाच्या भावनेने पेटलेल्या एका तरुणाने राजस्थानहून पालघर गाठले. मुलीच्या आईला आणि तिच्या लहान बहिणीला जाळण्याचा डाव पालघर पोलिसांनी वेळीच हाणून पाडित रेल्वे स्थानकावरून आरोपीला अटक केली.

पालघरमधील राहणाऱ्या एका मुलीचे राजस्थान-अजमेर येथील भैरोसिंग राघूवीरसिंग राठोड (28)  तरुणाबरोबर लग्न जमणार असताना हा आरोपी काही काम धंदा करत नसल्याचे त्या मुलीच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी या लग्नाला नकार दिला. या मुलीने त्यानंतर दुसरीकडे लग्न केले. हाच राग मनात ठेवून या आरोपीने तिला फेसबुकवरून बदनामी करायला सुरुवात केली. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. मात्र, काही दिवसांपासून आरोपीने मुलीच्या आईला फोनवरून त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागला.मुलीच्या आईने ही बाब पालघर पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आधी पोलीस अजमेर येथे त्याला शोधायला गेली. मात्र, गुरुवारी त्याचे लोकेशन पालघर येथे दाखवत असल्याने निरीक्षक दशरथ पाटील व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याला लोकेशननुसार शोधायला सुरुवात केली. मात्र, तो फोन बंद ठेवत असल्याने पोलिसांची अडचण वाढली होती. अखेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास आरोपीस पालघर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले गेले.

पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्या बॅगेत असलेल्या पेट्रोलने तो मुलीच्या आईला व मुलीच्या लहान बहिणीला जाळण्याचा प्रयत्न करणार होता अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकpalgharपालघरPoliceपोलिसRajasthanराजस्थानPetrolपेट्रोल