शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कंटेनरमध्ये सापडले 39 मृतदेह, ड्रायव्हर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 20:26 IST

कंटेनरमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 39 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

लंडन - कंटेनरमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 39 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना इंग्लंडमधील एसेक्स येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी एसेक्स पोलिसांनी उत्तर आयर्लंडमधील रहिवासी असलेला ट्रेलरचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीनाला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.  एसेक्स प्रांतातील ग्रेस शहराच्या ईस्टर्न एव्हेन्यू येथील वॉटरग्लेड इंडस्ट्रियल पार्कजवळ या संशयित ट्रेलरमधील कंटेनरबाबत अॅम्बुलन्स सर्व्हिसकडून पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच नॉर्दन आयर्लंडमधील ड्रायव्हर असलेल्या तरुणाला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.  एसेक्स पोलिसांनी सांगितले की, हे वाहन बुल्गारियामधून निघून शनिवारी एंगलेसे येथून होलिहेडमार्गे इंग्लंडमध्ये पोहोचले होते. प्राथमिक अंदाजानुसार या कंटेनरमध्ये असलेल्या सर्व 38 प्रौढ आणि एका किशोरवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला. या कंटेनरमध्ये असलेल्यांपैकी एकही व्यक्ती बचावली नाही.  दरम्यान, इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मी या घटनेबाबत सातत्याने माहिती घेत आहे. तसेच गृहविभाग एसेक्स पोलिसांसोबत मिळून तपासावर लक्ष ठेवून आहे. या घटनेमागचं नेमकं काय कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.'' असे जॉन्सन यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEnglandइंग्लंड