शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब; हाजी मस्तानच्या मुलानेच सांगितली पडद्यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 19:51 IST

बाळासाहेब ठाकरे हेही हाजी मस्तान यांचे चांगले मित्र होते असल्याची पडद्यामागील माहिती सुंदर शेखर यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे सुंदर शेखर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत बरोबर असल्याचे सांगितले. इतर बरेच नेतेही करीम चालला भेटायला यायचे. हाजी मस्तान एक व्यापारी होते.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा दत्तक पुत्र सुंदर शेखर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत बरोबर असल्याचे सांगितले. इंदिरा गांधींनी करीम लालाला भेटायला यायच्या. इतर बरेच नेतेही करीम चालला भेटायला यायचे. हाजी मस्तान एक व्यापारी होते. बाळासाहेब ठाकरे हेही हाजी मस्तान यांचे चांगले मित्र होते असल्याची पडद्यामागील माहिती सुंदर शेखर यांनी दिली आहे.तसेच संजय राऊत यांच्या इंदिरा गांधी याविषयीच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी आपले विधान मागे घेतले. राऊत म्हणतात की, आमच्या काँग्रेसच्या मित्रांना दु:खी होण्याची गरज नाही.

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबाबत केलेले विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी अखेर मागे घेतले आहे. मी केलेल्या वक्यव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्यावेळी मोठमोठ्या नियुक्त्यासुद्धा या अंडरवर्ल्डच्या सल्ल्याने होत. त्याकाळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

'इंदिरा गांधींनीच करीम लाला अन् हाजी मस्तानला तुरुंगात डांबले'काल पुण्यात झालेल्या लोकमत पत्रकारिता पुस्कारांच्या वितरण सोहळ्यात संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. एकेकाळी मुंबईवर आणि येथील राजकारणात असलेल्या अंडरवर्ल्डच्या दबदब्याबाबत राऊत म्हणाले होते की, ''त्याकाळी छोटा शकील, दाऊद हेच ठरवायचे पोलीस कमिशनर कोण होणार, हाजी मस्तान मंत्रालयात गेल्यावर संपूर्ण मंत्रालय त्याला घ्यायला खाली यायचे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या कुख्यात गुंड करिमा लाला याला भेटायला आल्या होत्या.'' मात्र या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले होते. अखेरीस आज मी केलेल्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेस धक्का लागला आहे असे वाटत असेल तर, तसेच त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो,  असे सांगत राऊत यांनी हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMumbaiमुंबईunderworldगुन्हेगारी जगत