शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून ब्लॅकमेलिंग करुन उकळली खंडणी; कोथरुडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 18:20 IST

दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : मैत्री करुन विश्वास संपादन केल्यानंतर काढलेल्या सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दोघा सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ वैभव दिलीप कातोरे आणि रोश दिलीप कातोरे (रा़ ओंकारपूरम सोसायटी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी कोथरुडमधील एका २५ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आणि वैभव कातोरे हे मुळचे नाशिकला राहणारे आहेत. नाशिकमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची २०११ मध्ये ओळख झाली होती. शिक्षणानंतर ही तरुणी नोकरीसाठी पुण्यात आली. त्यानंतर वैभवही भावासह पुण्यात राहायला आला. 

त्याने जुनी ओळख काढून पुन्हा मैत्री करुन या तरुणीचा विश्वास संपादन केला. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करु लागला. तिला वारंवार फोन करुन लग्न करण्यासाठी जबरदस्ती करु लागला. ही तरुणी ज्या कंपनीत काम करीत होती. तेथेही तो जाऊ लागला. तेथील कर्मचाऱ्यांना तो ती आपली बायको असल्याचे सांगून दम देऊ लागला. तिचा पाठलाग करुन त्याने तिचा विनयभंगही केला होता. दरम्यान, या तरुणीच्या घरच्यांनी तिचे लग्न जुळविण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार वैभवला समजल्यावर त्याने या तरुणीबरोबर काढलेले सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल करेल तसेच तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवेन, अशी धमकी दिली. तिला साडेसात हजार रुपये देण्यास भाग पाडले. वैभव याचा भाऊ रोशन हा पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. रोशनच्या मदतीने वैभव तिला त्रास देत होता. रोशन याने या तरुणीला फोन करुन मी मोबाईलच्या दुकानात आलो आहे, वैभवला फोन घ्यायचा आहे़ असे सांगून जबरदस्तीने १४ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करुन घेतला. दोघा भावांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे धाव घेतली़ पोलिसांनी विनयभंग, धमकी व खंडणी घेतल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध घेतला जात आहे़ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेrelationshipरिलेशनशिपPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी