धक्कादायक! ज्या डॉक्टरने नर्सला मारलं होतं, त्या डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत घरात आढळला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 14:42 IST2021-05-12T14:37:47+5:302021-05-12T14:42:12+5:30
डॉक्टर बीएम नागर यांचा मृतदेह त्यांच्या सरकारी घरात आढळून आला. यानंतर एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी आरोग्य विभागाचे अधिकारी पोहोचले.

धक्कादायक! ज्या डॉक्टरने नर्सला मारलं होतं, त्या डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत घरात आढळला...
उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एका सरकारी डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. हा तोच डॉक्टर बीएम नागर आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात आधी नर्स त्याला मारते आणि नंतर तो तिला मारतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं होतं. पण नंतर पुन्हा त्यांना सेवेत घेतलं गेलं.
डॉक्टर बीएम नागर यांचा मृतदेह त्यांच्या सरकारी घरात आढळून आला. यानंतर एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी आरोग्य विभागाचे अधिकारी पोहोचले. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला.
जीवाला धोका असल्याचं म्हणाले होते
डॉक्टर बीएम नागर यांच्या परिवारातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि एसपी यांना लिखित दिले की, आम्हाला मृतदेहाचं पोस्टमार्टम करायचं नाही. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला. विना पोस्टमार्टम मृतदेह परिवाराला देण्यात आल्याने प्रश्न उपस्थित झाला. काही दिवसांपूर्वीच डॉक्टर बीएम नागर यांनी जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान दोन आठवड्यांपूर्वीच जिल्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बीएम नागर आणि एका नर्समध्ये वाद झाला होता. यादरम्यान नर्सने डॉक्टरला मारलं होतं आणि नंतर डॉक्टरने नर्सला मारलं होतं. या घटनेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरची सेवा समाप्त केली होती. तर नर्सला सस्पेंड करण्यात आलं होतं.
या घटनेनंतर डॉक्टर बीएम नागर यांनी पोलीस अधिक्षक शुगन गौतम यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. आता त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर आरोग्य अधिकारी म्हणत आहे की, हा नैसर्गिक मृत्यू वाटतोय. त्यांना बीपी-शुगर वाढतो. एसपी डॉ. संसार सिंह म्हणाले की, त्यांच्या कुटुंबियांनुसार त्यांना शुगर आणि हार्टची समस्या होती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यांच्या परिवाराने लिहून दिलं की, हा नैसर्गिक मृत्यू आहे. कोणत्याही पोलीस कारवाईची गरज नाही.