शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हादरले! अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाने संपविले आयुष्य; जमिनीवरून वाद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:47 IST

Pune Sadiq Kapoor Suicide : प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि संबंधित व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता.

पुण्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच एका खळबळजनक घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून एका ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप झाला आहे. सादिक उर्फ बाबू कपूर असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

लष्कर भागातील कार्यालयात संपवले जीवन मिळालेल्या माहितीनुसार, सादिक कपूर यांनी पुणे कॅन्टोन्मेंटमधील लष्कर भागात असलेल्या आपल्या स्वतःच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या हातावर आणि एका कागदावर सुसाईड नोट लिहिली होती. या चिठ्ठीत त्यांनी हडपसरमधील उमेदवार फारुख शेख यांच्यासह इतरही काही जणांची नावे लिहिली असून, हे सर्वजण आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.

५ गुंठे जमिनीचा वाद ठरला कारण? प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि संबंधित व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. या वादातूनच कपूर यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. लष्कर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.

मृताची गुन्हेगारी पार्श्वभूमी आत्महत्या केलेले सादिक कपूर यांच्यावर यापूर्वी 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. एका बाजूला गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि दुसऱ्या बाजूला थेट निवडणुकीतील उमेदवाराचे नाव आत्महत्येशी जोडले गेल्याने, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Shaken: Man Ends Life Allegedly Due to Candidate's Harassment

Web Summary : Pune rocked as a 56-year-old allegedly died by suicide, blaming NCP candidate Farukh Shaikh for harassment related to a land dispute. The deceased, Sadiq Kapoor, left a suicide note naming Shaikh. Kapoor had a criminal history, adding a political angle to the case.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेस