शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सट्ट्यावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 23:33 IST

Crime News : गणेश भूतडा हा देशातील मोठा क्रिकेट बुकी असून अशोक जैन हा ही मोठा बुकी आहे. आयपीएलमध्ये रविवारी दोन्ही मोठे सामने होते.

पुणे : पुणे शहर पोलिसांनी रविवारी रात्री आयपीएलवर सट्टा खेळणार्या दोन ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई करत दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुक्कींसह अनेकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ९३ लाख रूपयांवर अधिकची रोकड जप्त केली आहे. या कारवाई दरम्यान, सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक जैन या दोघांसह काही जणांना ताब्यात घेतले आहे. 

समर्थ व मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठेतील एका ठिकाणी छापा टाकून टाकून गणेश भुतडा याला अटक करुन तेथून ९२ लाख ६५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर मार्केट यार्ड येथून अशोक जैन या बुकीला अटक करण्यात आली. तेथून ५१ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून अजूनही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती.

गणेश भूतडा हा देशातील मोठा क्रिकेट बुकी असून अशोक जैन हा ही मोठा बुकी आहे. आयपीएलमध्ये रविवारी दोन्ही मोठे सामने होते. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

त्यानुसार, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेच्या प्रभारी अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी एकाच वेळी ही कारवाई केली.
गणेश भुतडा आणि अशोक जैन यांच्याकडील डायऱ्या, मोबाईल आणि इतर काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यात या सट्ट्याच्या व्यवहाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIPLआयपीएल २०२१