शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

विकृत व्यक्तीचा स्वत:च्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुतण्यालाही बनविले वासनेची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 19:03 IST

Crime News : हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर घटनेचा बोभाटा झाला. त्यामुळे समाजमन संतप्त झाले आहे.

नागपूर : एका विकृत व्यक्तीने स्वताच्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर या विकृताने आपल्या भावाच्या सात वर्षीय मुलासोबतही अनैसर्गिक कृत्य केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर घटनेचा बोभाटा झाला. त्यामुळे समाजमन संतप्त झाले आहे.

संज्या नामक हा नराधम ४० वर्षांचा आहे. तो कामचुकार तर आहेच त्याला विविध विकृतीही जडली आहे. तो तृतीयपंथियांचा वेष करून घरून बाहेर पडतो आणि रस्त्यावर पैसे मागतो. ‘दुसरेही सावज’ शोधतो. घरच्या महिलांसोबतही त्याचे वर्तन विकृतच असल्याने त्याची आणि त्याच्या भावाची पत्नी अशा दोनही महिला संज्याच्या विकृतीला कंटाळून निघून गेल्या. त्यामुळे संज्याची आठ वर्षीय मुलगी, त्याचा भाऊ, भावाचा ७ वर्षीय मुलगा आणि वृद्ध आई असे पाच जण हुडकेश्वरमधील घरात राहतात. संज्याचा भाऊ चौकीदारी तर आई घरगुती काम करते. हे दोघे बाहेर गेल्यानंतर नराधम संज्या स्वत:च्या मुलीवर आणि पुतण्यावर वासना शमवत होता. 

शुक्रवारी दुपारी ३ वाजता अचानक संज्याची वृद्ध आई घरी परतली. तिने दार ढकलून बघताच विवस्त्रावस्थेतील नराधम चिमुकलीवर अत्याचार करताना दिसला. बाजूला सात वर्षीय चिमुकला होता. वृद्धेने आरोपी संज्याला लाथ घालून दूर केले आणि शिवीगाळ करून दोन्ही नातवांना घराबाहेर आणले. वृद्धा संतापाच्या भरात शिवीगाळ करताना बघून शेजाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. शेजारच्यांनी वृद्धेला पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वृद्धा दोन्ही चिमुकल्या नातवांना घेऊन हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. ठाणेदार सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा संतापजनक प्रकार ऐकून लगेच घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली.

शेजाऱ्यांचा संताप अनावरचिमुकली आणि चिमुकल्यांनी पोलिसांना सांगितलेली माहिती धक्कादायक आहे. हा नराधम या दोघांची अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करायचा. त्यांना मारहाणही करायचा. त्यामुळे हे बिचारे लहानगे गप्प राहायचे. पोलिसांनी त्यांना बोलते केले असता त्यांनी आपल्या बोबड्या भाषेत या नराधमाची विकृती कथन केली. ती ऐकून काही वेळेसाठी शेजाऱ्यांसोबत पोलिसांचाही संताप अनावर झाला.

असाही दैवदुर्योगमन सुन्न करणाऱ्या या प्रकरणात पीडित चिमुकले आहेत. आरोपी चिमुकलीचा बाप अन् चिमुकल्याचा मोठा बाप आहे. तर, या पापाचा बोभाटा करून या नराधमाविरुद्ध तक्रार करणारी पीडित चिमुकल्याची आजी (आरोपीची आई) आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी